Halaman

    Social Items

Pickles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Pickles लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

कैरी लोणचे । Mango Pickle North Indian Style Recipe in Marathi | How to make Mango Achar



लोणचे- उत्तर हिंदुस्थानी पद्धत 




कोणत्याही पदार्थाचे लोणचे घालता येते आणि ते चविष्टही लागते. तथापि, कैरीचा आंबटपणा जरा जास्तच, सर्वांना आवडतो म्हणूनच 'लोणचं' शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ती लालभडक खारात आणि तेलात बुडालेली कैरीचीच फोड. कैरीचे लोणचे आवडत नाही, असं सहसा होत नाही.

कैरी लोणचे । Mango Pickle North Indian Style Recipe  How to make Mango Achar
कैरी लोणचे । Mango Pickle North Indian Style Recipe  How to make Mango Achar


साहित्य:-


  • काळसर सालीच्या बाठ बाधलेल्या गोलाकार कैऱ्या ५ किलो,
  • प्रत्येकी १०० ग्रॅम जाड बडीशेप,
  • कलौंजी (कोटाचे बी),
  • लाल तिखट,
  • मेथीदाणा,
  • हळद,
  • मीठ अंदाजे ८०० ग्रॅम,
  • मोहरीचे तेल दीड किलो,
  • हिंग


कृती:-


  • कैऱ्या धुवून-पुसून त्याच्या शक्यतो बाठीसकट जरा मोठ्या आकाराच्या फोडी कराव्यात.
  • एका बरणीत जरा जास्त मीठ व दोन चमचे हळद घालून, त्या फोडी त्यात घालून बरणी चांगली हलवावी.
  • झाकण बंद करून रात्रभर ठेवावी.
  • सकाळी त्या फोडींना खूप पाणी सुटेल.
  • तेव्हा एका स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या चाळणीवर त्या फोडी ओताव्यात.
  • पाणी पूर्ण निथळून जाऊ द्यावे.
  • नंतर एका पांढ-या फडक्यावर त्या फोडी तास दीड तास उन्हात वर पातळ कपडा घालून सुकु द्याव्यात.
  • फोडींचे पाणी पुर्ण सुकले गेले पाहिजे.
  • मेथीदाणा, बडीशेप आणि कलौंजी थोडी जाडसर दळुन (मिक्सरमधून) घ्यावी.
  • एका मोठया परातीत हा दळलेला मसाला, मीठ, हळद व तिखट, हिंग सर्व एकत्र करून घ्यावे.
  • त्यात आंब्याच्या फोडी थोड्या-थोड्या करून मिसळाव्यात
  • व बरणीत भरून ठेवावे.
  • मोहरीचे तेल धूर निघेपर्यंत गरम करावे.
  • गॅस बंद करावा.
  • तेल पूर्ण थंड होऊ द्यावे
  • व मग बरणीत लोणच्यावर ओतावे.
  • सर्व फोडी तेलात बुडालेल्या राहतील, इतके तेल लोणच्यात असले पाहिजे.



टीप:-

या लोणच्यात मोहरी नसल्यामळे ते खराब होण्याची शक्यता कमी असते.

कैरी लोणचे । Mango Pickle North Indian Style Recipe in Marathi | How to make Mango Achar

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi| How to make Vegetable Pickle | Achar 



साहित्य-


  • एक मध्यम आकाराचे फूल कोबीचा गड्डा,
  • चार गाजरे,
  • एक मुळा,
  • तीन चार हिरव्या मिरच्या,
  • आल्याचा मोठा तुकडा.
  • एक पाव शलगम,
  • पाच-सात आवळे,
  • शंभर ग्रॅम गुळ,
  • एक वाटी मोहरीची डाळ.
  • एक चमचा मेथी दाणा,
  • हिंग,
  • पावशेर मोहरीचे तेल,
  • पाव वाटी,
  • लाल तिखट,
  • पाच-सहा चमचे हळद,
  • एक चमचा मोहरी,
  • एक कप व्हिनिगर.


भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe | How to make Vegetable Pickle | Achar  २
भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe | How to make Vegetable Pickle | Achar  २


कृती-


  • सर्व भाज्या धुवून पुसून त्यांचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करा.
  • एक मोठी चिनीमातीची बरणी घेऊन त्यात पाणी व भरपूर मीठ घालावे.
  • भाजीचे केलेले सर्व तुकडे त्या पाण्यात टाकून तीन दिवसापर्यंत झाकून ठेवावे.
  • तिसऱ्या दिवशी त्यातले पाणी काढून फेकून द्या
  • व एका मोठ्या भांड्यात सर्व भाज्या दोन-तीनदा पाणी टाकून चांगले खळखळून धुवून घ्या.
  • चाळणीवर निथळत ठेवा.
  • नंतर एका पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर त्या भाज्या सावलीतच पसरून चार-पाच तास सुकू द्यावे.
  • कढईत एक छोटा चमचा तेल घाला
  • त्यात मेथीदाणा व हिंग तळून घ्या.
  • मिक्सरमधून मेथीदाणा, हिंग व मोहरीची डाळ (जाड असल्यास) एक मिनिट फिरवून बारीक करा.
  • एका मोठ्या प्लेट मध्ये तिखट, हळद, मीठ, हिंग, मेथी दाणे व मोहरीची पूड मिक्स करून त्याचे गोलाकार आळे सारखे बनवा.
  • कढईत मोहरीचे तेल घाला.
  • गॅसवर ठेवा.
  • त्यातून वाफ/धुर येईल इतके ते तापवा,
  • गॅस बंद करा.
  • तेलाचा पूर्ण धूर निघून जाऊ द्या.
  • त्यात एक चमचा मोहरी, हिंग व हळद घाला
  • ते गरम तेल परातीतल्या मसाल्यावर ओता.
  • चमच्याने सर्व मसाला तेलात एकत्र करा.
  • पूर्ण थंड होऊ द्या.
  • थोड्या थोड्या करुन भाज्या घेऊन मसाल्यात मिक्स करून बरणीत भरत जावे.
  • शेवटी गुळाचा खडा बारीक करून व एक मोठा कप व्हिनेगर टाकून मिक्स करा.
  • हलवून बरणी बंद करा.
  • एक दिवसानंतर खाण्यास घ्या.
  • व्यवस्थित ठेवले तर हे लोणचे खूप दिवस टिकते.

भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi | How to make Vegetable Pickle | Achar २