Halaman

    Social Items

Chutney लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Chutney लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

तोंडल्याची कोशिंबीर रेसीपी मराठी | कुंदरू का सलाड। तोंडली ची कोशिंबीर | तोंडलीची कोशिंबीर | कोशिंबीर रेसिपी | उन्हाळा स्पेशल थंडगार तोंडल्याची कोशिंबीर | Tondli chi koshimbir Recipe in Marathi | tindora salad tendli | tondli | Kundaru

कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney in Marathi। Kairi Chutney Recipe



साहित्य:-

  • अर्धा किलो कैऱ्या,
  • जेवढे गोड आवडेल तेवढा अंदाजे गुळ,
  • पाव वाटी तेल,
  • एक चमचा तिखट,
  • फोडणीसाठी मोहरी,
  • जिरे
  • हिंग
  • हळद,
  • चवीपुरते मीठ.

कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney । Kairi Chutney Recipe
कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney । Kairi Chutney Recipe 


कृती:-

  • कुकरमध्ये खाली पाणी घालून एका पसरट भांड्यात कैऱ्या ठेवा
  • व त्यात वाफ तयार होईल इतकेच पाणी घाला.
  • दोन शिट्या होऊ द्या.
  • कैऱ्या थंड झाल्यावर सोलून त्याचा गर काढा.
  • त्यात गुळ मिसळा,
  • हलवून ठेवा म्हणजे गुळ विरघळेल.
  • आता एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये ते कडक होणार नाही इतपतच शिजवा.
  • त्यातच तिखट व मीठ घाला.
  • खाली उतरवून त्यावर जरा जास्त तेलात मोहरी, जिरे, हळद, हिंगाची फोडणी घाला.
  • ही चटणी ब्रेडबरोबर छान लागते.

कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney in Marathi। Kairi Chutney Recipe

कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा | Kairi Chutney / Murabba Recipe in Marathi | How to make Mango Chutney



साहित्य:-

  • एक किलो कैऱ्या,
  • साखर,
  • दोन चमचे तिखट,
  • पाच-सात लवंगा,
  • दालचिनीचा तुकडा,
  • १०-१२ काळे मिरे,
  • एक चमचा जिरे
  • चवीपुरते मीठ.

कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा  | Kairi Chutney / Murabba Recipe | How to make Mango Chutney
कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा  | Kairi Chutney / Murabba Recipe | How to make Mango Chutney


कृती:-

  • कैऱ्या धुवून, पुसून त्यांची साले काढावीत
  • व किसून घ्याव्यात.
  • जेवढा किस असेल तेवढीच साखर घेऊन, दोन्ही एकत्र करून जाड बुडाच्या कढईत मंदाग्नीवर शिजत ठेवावे.
  • मधून-मधून हलवत राहावे.
  • साखरेचा पाक होऊन त्यात कैरीचा किस व्यवस्थित शिजल्यावर त्यात तिखट, मीठ व वर सांगितलेला गरम मसाला दरदरीत (जाडसर) दळून त्यात घालावा.
  • आवडत असल्यास छोटी विलायचीचे दाणेही घालावेत.
  • पाच-सात मिनिटे शिजवून पूर्ण थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. 



टीप:-

हाच छुुंदा जर साखर आणि कैरीचा किस एका काचेच्या मोठ्या तोंडाच्या बाटलीत भरून वर पातळ फडक्याने त्या बाटलीचे तोंड बांधून उन्हात इतक्या दिवस ठेवला की साखरेचा पाक होऊन पुन: तो घट्ट होईल व नंतर त्यात वरील मसाले घातले तर त्याची चव काही वेगळीच लागते.

कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा | Kairi Chutney / Murabba Recipe in Marathi | How to make Mango Chutney