कच्चा कैरीचा मेथांबा रेसीपी मराठीत | Kacha Kairi Methamba Recipe in Marathi | Kacha Aam Recipe | Raw Mango Relish Recipe in Marathi
मेथांबा साहित्य -
- कच्चा कैऱ्या दोन मध्यम आकाराच्या,
- गूळ १ वाटी,
- मेथी १/२ चमचा,
- हिंग,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- तेल.
कृती -
- कैरीची साल काढून त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्या.
- कढईत तेल टाकून हिंगाची फोडणी करावी.
- त्यात मेथीदाणे टाकावे
- नंतर कैरीच्या फोडी टाकून तिखट, मीठ, टाकावे.
- झाकण ठेवावे.
- झाकणीवर पाणी ठेवावे.
- २/३ मिनिटात झाकणीतले पाणी कैरीच्या फोडींवर टाकावे.
- पाणी कमीच टाकावे.
- शिजायला लागेल एवढेच.
- फोडी शिजल्यावर गूळ घालून चांगले उकळू द्यावे.
- हा मेथांबा मुलांना फार आवडेल.
- आंबट गोड चव जेवणाची लज्जत नक्कीच वाढवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.