तोंडल्याची रस्सा भाजी रेसीपी मराठी | तोंडलीची रस्सा भाजी रेसिपी | तेंडली की रस्सेवाली सब्जी | टेंडली मसाला | तोंडली रस्सा | Ivy gourd Curry | Tondli cha rassa Bhaji Recipe in Marathi | Tendli Masala Recipe | Tindora Curry Recipe | Kundru Ki Sabzi | Ivy Gourd Recipe | Kaaye Rasa
प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.
साहित्य-
- १ पाव तोंडली,
- ग्रेव्हीसाठी १ बारीक चिरलेला कांदा,
- १ चमचा दाण्याचा कूट,
- १ चमचा धणेपूड,
- १ चमचा खसखस,
- थोडी कलमी,
- २-३ वेलदोडे,
- २ लवंगा हे सर्व भाजून (थोड्या तेलात) बारीक वाटावे.
- २ मसाल्याची पाने (तेजपान),
- १ चमचा लाल काश्मिरी तिखट,
- २ चमचे गरम मसाला,
- हळद,
- मीठ,
- कोथिंबीर व
- खोबऱ्याचा कीस,
- १ टोमॅटोची पेस्ट,
- साखर.
कृती-
- प्रथम तोंडली धुवून पुसून घ्यावीत.
- वांग्याप्रमाणे मधुन काप द्यावेत.
- वाटलेल्या बारीक मसाल्यात तिखट, मीठ घालून तोडल्यात भरावा.
- तेलात तोंडली तळून घ्यावीत.
- त्याच तेलात तेजपान व उरलेला मसाला घालून लालसर परतावे.
- नंतर हळद, तिखट, थोडे मीठ, १ चमचा गरम मसाला घालून टोमेटो पेस्ट व साखर टाकावे व
- चांगले परतल्यावर तोंडली घालावीत,
- चांगले एकजीव करावे.
- सर्व परतून नंतर १ ग्लास पाणी (गरम) घालावे.
- चांगले उकळल्यावर त्यात कोथिंबीर खोबऱ्याचा कीस टाकून भांड्यात काढावे व
- भाता बरोबर, पोळीबरोबर खाण्यास द्यावे.
टीप-
- तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत.
- भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात.
- म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.