गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna
साहित्य -
- गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात १ वाटी,
- कैरी १
- साखर १ वाटी,
- चिमूटभर मीठ,
- आईसक्यूब
गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna |
कृती-
- गव्हांकुराची पान मिक्सीतून थोडं पाणी टाकून बारीक करा.
- बाऊलमध्ये गाळून घ्या.
- गॅसवर कैरी भाजायला ठेवा.
- भाजण्यापूर्वी कैरीला टोचे मारून घ्या. (वांग्यासारखी कैरी भाजली पाहिजे)
- भाजल्यावर कैरी गार पाण्यात ठेवा.
- नंतर साल काढून गर बाऊलमध्ये काढा.
- मिक्सीतून फिरवा.
- गव्हांकुराच गाळण, साखर, मीठ २ ग्लासे पाणी टाकून कैरीचा गर चांगला एकजीव करा.
- साखर विरघळल्यावर ग्लासमध्ये पन्हे देताना आईसक्यूब टाका.
टीप-
१) उन्हाळ्यात ऊन लागल्यास (झाव लागल्यावर) या पन्ह्याने लवकर आराम होतो.
१) उन्हाळ्यात ऊन लागल्यास (झाव लागल्यावर) या पन्ह्याने लवकर आराम होतो.
२) गव्हांकुर पाती रसाच्या पाककृती करताना रस ताजा व कच्चाच वापरावा. रस गरम किंवा शिजवू नये. गरम करण्याने रसातील गुणधर्म नष्ट होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.