Halaman

    Social Items

Drinks or Juice लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Drinks or Juice लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna

साहित्य -

  • गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात १ वाटी,
  • कैरी १
  • साखर १ वाटी,
  • चिमूटभर मीठ,
  • आईसक्यूब

गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna
गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna

कृती-

  • गव्हांकुराची पान मिक्सीतून थोडं पाणी टाकून बारीक करा.
  • बाऊलमध्ये गाळून घ्या.
  • गॅसवर कैरी भाजायला ठेवा.
  • भाजण्यापूर्वी कैरीला टोचे मारून घ्या. (वांग्यासारखी कैरी भाजली पाहिजे)
  • भाजल्यावर कैरी गार पाण्यात ठेवा.
  • नंतर साल काढून गर बाऊलमध्ये काढा.
  • मिक्सीतून फिरवा.
  • गव्हांकुराच गाळण, साखर, मीठ २ ग्लासे पाणी टाकून कैरीचा गर चांगला एकजीव करा.
  • साखर विरघळल्यावर ग्लासमध्ये पन्हे देताना आईसक्यूब टाका.

टीप-

१) उन्हाळ्यात ऊन लागल्यास (झाव लागल्यावर) या पन्ह्याने लवकर आराम होतो.
२) गव्हांकुर पाती रसाच्या पाककृती करताना रस ताजा व कच्चाच वापरावा. रस गरम किंवा शिजवू नये. गरम करण्याने रसातील गुणधर्म नष्ट होतात.

गव्हांकुराची पान व कैरीचे पन्हे | भाजलेल्या कैरीचे पन्हे | Roasted Kairiche Panhe Recipe in Marathi | Aam Panna

सोलकढी | Solkadhi Recipe in Marathi | How to make Solkadhi

साहित्य-

  • पाच सहा ताजी आमसुले,
  • एक कप नारळाचे दूध,
  • एक छोटी हिरवी मिरची,
  • दोन लसणाच्या पाकळ्या,
  • पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड,
  • साखर,
  • मीठ,
  • कोथिंबीर,
  • पुदिना.

सोलकढी | Solkadhi Recipe | How to make Solkadhi
सोलकढी | Solkadhi Recipe | How to make Solkadhi

कृती-

  • आमसुले दोन तास पाण्यात भिजत ठेवा.
  • हलके त्याच पाण्यात कुस्कुरा.
  • पाणी गाळून घ्या.
  • मिरच्या, लसूण बारीक वाटा.
  • मग ते आमसुलाच्या पाण्यात घाला.
  • त्यात नारळाचं दूध व चवीप्रमाणे साखर मीठ घाला व गाळा.
  • फ्रीजमध्ये ठेवून थंड करून द्यावे.
  • देतांना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना भुरभुरावा.

सोलकढी | Solkadhi Recipe in Marathi | How to make Solkadhi