सोलकढी | Solkadhi Recipe in Marathi | How to make Solkadhi
साहित्य-
- पाच सहा ताजी आमसुले,
- एक कप नारळाचे दूध,
- एक छोटी हिरवी मिरची,
- दोन लसणाच्या पाकळ्या,
- पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड,
- साखर,
- मीठ,
- कोथिंबीर,
- पुदिना.
कृती-
- आमसुले दोन तास पाण्यात भिजत ठेवा.
- हलके त्याच पाण्यात कुस्कुरा.
- पाणी गाळून घ्या.
- मिरच्या, लसूण बारीक वाटा.
- मग ते आमसुलाच्या पाण्यात घाला.
- त्यात नारळाचं दूध व चवीप्रमाणे साखर मीठ घाला व गाळा.
- फ्रीजमध्ये ठेवून थंड करून द्यावे.
- देतांना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना भुरभुरावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.