Halaman

    Social Items

तोंडल्याची ठेचलेली भाजी रेसीपी मराठी| तोंडल्याची रुचकर भाजी | तोंडली ची भाजी | Tondli chi Bhaji Recipe in Marathi | Lvy Gourd Bhaji Recipe

 तोंडल्याची ठेचलेली भाजी रेसीपी मराठी| तोंडल्याची रुचकर भाजी | तोंडली ची भाजी | Tondli chi Bhaji Recipe in Marathi |  Lvy Gourd Bhaji Recipe







प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.





साहित्य- 


  • तोंडले कोवळे व हिरवे (लाल नकोत) १ पाव, 
  • लसूण ४-५ पाकळ्या, 
  • लाल काश्मिरी तिखट, 
  • हळद, 
  • हिंग, 
  • मीठ, 
  • गोडा मसाला (के.प्र.चा), 
  • कोथिंबीर बारीक चिरलेली, 
  • लिंबाचा रस, 
  • साखर, 
  • तेल, 
  • मोहरी, 
  • खोबऱ्याचा कीस, 
  • हिरवी मिरची २. 
  • जिरे, 
  • आलं.






कृती- 


  • एक दगडी खलबत्त्यात लसूण व तोंडली वेगवेगळी जाडसर ठेवा. 
  • नंतर थोड्या जास्त तेलात मोहोरी टाकून ती तडतडल्यावर लसूण टाका व परता. 
  • त्यावर हिंग, तिखट, हळद, ठेचलेली मिरची, आलं, जिरं टाकून परता. 
  • त्यावर ठेचलेली तोंडली, मीठ, मसाला, लिंबाचा रस, साखर टाकून चांगली खमंग परता. 
  • झाकण ठेवून मंदाग्नीवर ठेवा. 
  • वाफ आल्यावर कोथिंबीर टाकून पुनः परता. 
  • नंतर भांड्यात काढून वरून खोबऱ्याचा कीस टाकून सर्व्ह करा. 
  • तोंडली ठेचल्यामुळे लवकर शिजतात व 
  • नेहमी चिरलेल्या तोंडल्याच्या भाजीपेक्षा ही भाजी चवदार व वेगळी लागते. 






टीप- 


  • तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत. 
  • भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात. 
  • म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.

























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.