Halaman

    Social Items

गव्हांकुर पात व कवठ सरबत रेसिपी मराठीत | Wheat Leaf and Kavath Syrup Recipe in Marathi

गव्हांकुर पात व कवठ सरबत रेसिपी मराठीत | Wheat Leaf and Kavath Syrup Recipe in Marathi



साहित्य-


  • गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात एक वाटी,
  • पिकलेल्या कवठाचा गर १/२ वाटी,
  • साखर १ वाटी,
  • मीठ १ चमचा,
  • जिरेपूड १ चमचा,
  • आईसक्यूब,
  • तुळशीची पाने चिरलेली २ चमचे.



कृती-



  • प्रथम गव्हांकुराची पात व कवठाच्या गराची मिक्सीतून थोडं थोडं पाणी टाकून मऊशार पेस्ट करा.
  • पेस्ट गाळून घ्या.
  • बाऊलमध्ये साखर, मीठ व ४ ग्लास पाणी घालून विरघळावा.
  • ग्लासमध्ये सरबत देताना त्यात जिरेपूड व तुळशीची पाने टाका.
  • आईसक्यूब घालून सर्व्ह करावे.



टीप-


  • उन्हाळी लागल्यास थोडं थोडं सरबत प्यावे.
  • साखरेऐवजी गाठी (साखरेचे पदक) वापरल्यास उत्तम.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.