गव्हांकुर पातीचा रस व आवळा सरबत रेसिपी मराठीत । Wheat Leaf Juice and Amla Syrup Recipe in Marathi । Amala Sharbat
साहित्य-
- गव्हांकुराची धुऊन चिरलेली कोवळी पात १ वाटी.
- आवळ्याचे तुकडे १/२ वाटी,
- साखर १ वाटी,
- पुदिन्याची बारीक चिरलेली पाने २ चमचे,
- चिमूटभर मिरपूड,
- चवीनुसार मीठ
- आईसक्यूब
कृती-
- गव्हांकुराच्या पातीची व आवळ्याची मिक्सीतून वेगवेगळी मऊशार (थोडं थोडे पाणी घालून) पेस्ट करावी.
- दोन्ही पेस्ट बाऊलमध्ये गाळणीने गाळून घ्या.
- त्यात मीठ साखर व चार ग्लास पाणी (पाण्याचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.)
- घालून विरघळवा.
- ग्लासमध्ये देताना वरून मीरपूड व पुदिन्याची बारीक चिरलेली पाने टाका.
- आईसक्यूब घालून सर्व्ह करा.
टीप -
उन्हामुळे पित्त वाढल्यास हे सरबत दिवसभर हमखास थोडं थोडं प्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.