तोंडली रेसीपी मराठी | भरवा तोंडली | मसालेदार भरली तोंडली | भरवा कुंदरू | Bharwa Tendli Recipe in Marathi | Quick recipe | Satvik Rasoi | Stuffed Tendli | How to make Bharwan Tendli | Bharwa Kundru | Bharleli Tondli | Bharli Tondli | Stuffed Tindora Recipe | Bharli Tondli | Stuffed Ivy gourd
प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.
साहित्य-
- १ पाव तोंडली कोवळी हिरवी,
- १ वाटी बेसन,
- तेल,
- अर्धा चमचा तिखट,
- मीठ,
- हळद,
- जिरेपूड,
- भाजलेले थोडे तीळ,
- कोथिंबीर,
- पनीर कीस.
कृती-
- प्रथम तोंडली धुवून पुसून जुळून राहतील असा मधून काप द्यावा.
- बेसनात तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, तीळ, कोथिंबीर मिसळून थोडे दाट भिजवावे व
- प्रत्येक तोंडल्यात भरावे.
- तेल गरम करून ही तोंडली तळावीत.
- प्लेटवर कागद किंवा टिश्यू पेपर टाकून त्यावर काढावीत.
- म्हणजे तेल राहणार नाही.
- वरून कीस व कोथिंबीर घालावी.
- ब्रेडबरोबरही ही तोंडली चांगली लागतात.
टीप-
- तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत.
- भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात.
- म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.