तोंडल्याची कोशिंबीर रेसीपी मराठी | कुंदरू का सलाड। तोंडली ची कोशिंबीर | तोंडलीची कोशिंबीर | कोशिंबीर रेसिपी | उन्हाळा स्पेशल थंडगार तोंडल्याची कोशिंबीर | Tondli chi koshimbir Recipe in Marathi | tindora salad tendli | tondli | Kundaru
प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.
साहित्य-
- १ पाव हिरवी अगदी कोवळी तोंडली,
- दाण्याचा कूट २ चमचे,
- तिखट,
- मीठ,
- गोड दही
- कोथिंबीर,
- खोबऱ्याचा कीस
- व तेलमोहरी व हिंगाची फोडणी
- चवीला साखर.
कृती-
- काकडी तासतो तसे तोंडले सुरीने तासून कापावे.
- त्यात तिखट, मीठ, दाण्याचा कूट, साखर व दही चांगले मिसळून हिंग जिऱ्याची व मोहरीची तेलाची खमंग फोडणी द्यावी.
- वरून कोथिंबीर बारीक चिरून टाकावी.
- ही कोशिंबीर काकडीसारखी लागते.
टीप-
- तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत.
- भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात.
- म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.