Halaman

    Social Items

तोंडली पुलाव रेसीपी मराठी | महाराष्ट्रीयन मसाले भात तोंडली भात | HOW TO MAKE PULAV Recipe in marathi | Tondli Bhaat | Tendli Bhaat | TONDALI RICE RECIPE | pulao | masala bhaat | Tindora Rice | Maharashtrian Masale Bhaat

 तोंडली पुलाव रेसीपी मराठी | महाराष्ट्रीयन मसाले भात तोंडली भात | HOW TO MAKE PULAV Recipe in marathi | Tondli Bhaat | Tendli Bhaat | TONDALI RICE RECIPE | pulao | masala bhaat | Tindora Rice | Maharashtrian Masale Bhaat 






प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.




साहित्य- 


  • १ वाटी तांदुळ, 
  • उभे चिरलेले कोवळे तोंडले आर्धी वाटी, 
  • जिरेपूड, 
  • धणेपुड, 
  • आलं, 
  • मिरच्या जाडसर पेस्ट, 
  • मीठ.
  • २ लवंगा,
  • २-३ लसण, 
  • वेलदोडे, 
  • तेल, 
  • मोहरी, 
  • हिंग, 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर, 
  • २-३ चमचे गोड दही, 
  • साखर चवीला, 
  • खोबऱ्याचा कीस, 
  • तिखट 
  • थोडी हळद






कृती- 


  • प्रथम तांदूळ धुवून कोरडे करावेत. 
  • १ चमचा कढईत तेलात तांदूळ साधारण भाजावे. 
  • नंतर कुकरमध्ये तेल मोहरी जिरे टाकावे. 
  • तडतडल्यावर हिंग, लवंग, वेलदोडे, पेस्ट धणेपूड, जिरेपूड टाकून परतावे. 
  • त्यावर उभे चिरलेल्या तोंडल्याचा फोडी टाकून परतावे. 
  • त्यात भाजलेले तांदूळ टाकावे. 
  • चांगले एकजीव झाल्यावर दही, साखर, मीठ कोथिंबीर टाकून परतावे व 
  • नेहमीच्या पुलावला पाणी टाकतो तसे २ वाट्या पाणी टाकावे. 
  • कुकरच्या २ शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा. 
  • भांड्यात वेळेवर गरम पुलाव काढून कोथिंबीर, खोबरे व थोडे साजूक तूप टाकून एकजीव करून सर्व्ह करावे 
  • हा तोंडले भात छान लागतो.





टीप- 


  • तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत. 
  • भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात. 
  • म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.