Halaman

    Social Items

तोंडल्याचे सॅलेड रेसीपी मराठी | Tondli Salad Recipe in Marathi

 तोंडल्याचे सॅलेड रेसीपी मराठी | Tondli Salad Recipe in Marathi 







प्रत्येक भाजीत विविध प्रकारची वेगवेगळी जीवनसत्वं व पोषण द्रव्यं असतात. त्याचा आरोग्याकरिता फार फायदा होतो. काही काही भाज्या सर्व ऋतूत मिळतात. पण व्यक्तीपरत्वे विशिष्ट भाज्यांच्या आवडीमुळे दुर्लक्षित होतात. अशाच भाज्यांमध्ये तोंडल्याची भाजी! परंतु ही भाजी सर्वांनाच आवडते असे नाही. विशिष्ट पद्धतीने, प्रकाराने ही भाजी केल्यास नक्कीच आवडेल. तोंडले हा प्रकार काकडीसारखाच आहे. मधुमेहींकरिता तोंडले फायदेशीर आहे. सारस्वतांमध्ये या भाजीचा प्रकार जास्त प्रमाणात करतात. या भाजीचे प्रकार बघू या.




कृती- 


  • तोंडली उभी व पातळ चिरावीत. 
  • त्यात दाणे, हिरवे मोड आलेले मूग, बारीक चिरलेल्या मिरच्या, तिखट, मीठ, लिंबाचा रस व साखर टाकून एकत्र करावे 
  • हे सॅलेड काकडीप्रमाणे लागते. 
  • वरून कोथिंबीर टाकावी.





टीप- 


  • तोंडल्याची भाजी किंवा कोणताही पदार्थ असो लाल तोंडली घेऊ नयेत. 
  • भाजीकरिता काही वेळा गोल फोडी कराव्यात तर कधी उभ्या फोडी कराव्यात. 
  • म्हणजे थोडा रुचीत बदल होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.