खमंग तडका रेसीपी मराठी | 8 प्रकार च्या तडका रेसीपी | Khamang Tadaka Recipe in Marathi | 8 Type of Tadka Recipe
शाही तडका- Shahi Tadka Recipe
- तेल चांगले गरम करून त्यात जिरे टाकावे.
- त्यातच काजु बदामाचे तुकडे व किसमीस टाकून परतावे.
- जास्तवेळ तेलात राहु देऊ नये.
- ही फोडणी पुलाव, बिरयाणी. सर्व मिश्र भाजी किंवा इतर भाज्यांमध्ये टाकल्यास भाज्यांना व पदार्थाला वेगळीच चव येते.
दालफ्राय तडका- Dalfry Tadka Recipe
- तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे टाकावे.
- तडतडल्यावर बारीक केलेला लसूण, लाल मिरच्या, तिखट, हिंग थोडी बारीक केलेली लवंग, मिरे (थोडे) टाकून परतून दालफ्राय किंवा कोणत्याही डाळीला फोडणी (तडका) द्यावा.
- फार चवदार लागतो.
कढीचा तडका - Kadhicha Tadka Recipe
- कढी चांगली उकळल्यावर वरून तडका देण्याकरीता चमचाभर तुपात किंवा गरम केलेल्या तेलात हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मेथ्यादाणे, लवंग, मिरे, सबंध लाल मिरच्या व शेवटी थोडेच तिखट टाकावे.
- तडका दिल्यावर वरून कोथिंबीर व आल्याची पेस्ट त्यात टाकून कढी उकळावी.
- चिमूटभर साखरही टाकावी.
- ह्या तडक्यामुळे कढीचा रंग बदलतो व
- कढी खमंग लागते.
तिळाचा तडका- Tilacha Tadka Recipe
- तिळाचे तेल गरम करावे.
- त्यात काळे किंवा पांढरे तीळ टाकावे.
- तडतडल्यावर शेंगदाण्याचा साधारण जाडसर कुट टाकून थोडावेळ परतावे.
- हा तयार झालेला तडका फोडणीच्या वरणात, पुलाव व पातळ भाजीत तसेच दही लावलेल्या चटणीत टाकावा.
- ह्या तडक्यामुळे चटणी लवकर खराब होत नाही.
- तिळामुळे व शेंगदाण्याच्या कुटामुळे पदार्थाला वेगळीच चव येते.
दक्षिण भारतीय तडका - dakshin Bhartiy Tadka | South Indian Tadka
- तेल गरम झाल्यावर मोहरी व जिरे टाकावे.
- तडतडल्यावर त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्याचे तुकडे, हिंग टाकावा व सांबार, नारळाची चटणी व फोडणीच्या भातावर टाकावा.
- पदार्थ चवदार होतो.
पंजाबी तडका- Punjabi Tadka Recipe
- तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, चांगला खमंग होईपर्यंत परतावा.
- त्यात आले, लसूण जिर ह्याची पेस्ट, बारीक चिरलेले टोमॅटो (लाल) व गरम मसाला टाकून हा तडका सरसुच्या तेलाच्या फोडणीत टाकून दाल फ्राय व इतर भाज्यात टाकतात व
- मक्याच्या भाकरीबरोबर खातात.
- हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरच्या व चिमूटभर हळद याचा तडका ढोकळे, वडाभात, भजेभात, डाळभाजी व हरभऱ्याच्या डाळीची वाटलेली फोडणी दिलेली चटणी ह्यावर देतात.
हळदीच्या लोणच्यावरचा तडका- Haladi Lonche Tadka Recipe
- हळदीच्या लोणच्यात लिंबू साखर आल्याचे तुकडे व हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकल्यावर तेल गरम करून मोहरी तडतडल्यावर मोहरीच्या डाळीवर तेलात हिंग टाकून त्यावर टाकतात व
- गार झाल्यावर लोणच्यात मिसळतात.
आंब्याच्या लोणच्यात तडका (वर्षभराच्या लोणच्यात)- Raw Mango Lonche Tadka
- मोहरीची डाळ, मेथ्या तळुन बारीक वाटून त्यात टाकून, लाल तिखट हळद एकत्र करतात व
- त्यावर तेल गरम करून मोहरी तडतडल्यावर हिंग टाकुन वरील मिश्रणात हा तडका टाकतात.
- गार झाल्यावर आंब्याच्या फोडणीत मीठ मिसळून लोणच्यात टाकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.