कडधान्य नुडल्स रेसीपी मराठी | Cereal noodles Recipe in Marathi
साहित्य-
- २ वाटी मूग,
- १/२ वाटी मटकी,
- आवडीनुसार इतर कडधान्य,
- २ वाटी उकळलेल्या नुडल्स,
- बारीक चिरलेला कांदा १/२ वाटी
- बारीक चिरून टोमॅटो १/२ वाटी,
- किसलेला अद्रक १ चमचा,
- १ चमचा लसुण बारीक चिरून
- अजीनोमोटो अर्धा च.
- ३ चमचे तेल
- मीरे पूड पाऊण च.
कृती-
- प्रथम मूग व मटकी वाफवून घ्या.
- एका कढईमध्ये तेलावर लसूण घाला,
- कांदा घाला व परता
- आल्याचा किस घाला,
- टोमॅटो घाला,
- सॉसेस व मीरेपूड घाला.
- चवीनुसार मीठ व तिखट घाला,
- कडधान्य घाला
- व वाफ येऊ द्या.
- वरून उकडलेल्या नुडल्स घाला व
- वाफ येऊ द्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.