चिरोटे रेसीपी मराठी | एकदम हलके आणि नाजूक पाकळ्यांचे चिरोटे | चिरोटे बनवा सोप्या पद्धतीने | गुलाबाच्या पाकळ्या सारख्या लयरस साठी बनवा या प्रकारे परफेक्ट पकातले लेयर चिरोटे |पाकातील पुरी | खुसखुशीत चिरोटे | खाजा रेसिपी | पाकातले चिरोटे | layer chirote Recipe in Marathi | sweet Chirote | Pakatle Chirote । Indian traditional sweet ।Chirote Recipe | Sweet Chirote Recipe | Khaja Recipe | Sweet Khaja | Khaje | Diwali Recipe | Pakatali Puri | Chirote | How to make chirote | Diwali faral recipe
साहित्य:-
- १ वाटी मैदा,
- तूप,
- दूध,
- चवीपुरते मीठ,
- कॉर्नफ्लोअर २-३ चमचे अंदाजे साटा करण्याकरिता,
- वेलची पूड.
कृती:-
- प्रथम मैद्यात गरम तुपाचे व थोड्या मिठाचे मोहन टाकून दुधाने घट्ट भिजवावा व
- दोन तास ठेवावा.
- नंतर एका पसरट भांड्यात थोडे तूप व कॉर्नफ्लोअर व वेलची पूड टाकुन चांगले फेटून साटा तयार करावा.
- मग मैदा चांगला कुटून मऊ करून लहान लहान गोळ्याच्या चार पातळ पोळ्या लाटाव्यात.
- एका पोळीवर तयार केलेले साटे सर्व बाजूने लावावे.
- त्यावर दुसरी पोळी ठेवून त्यालाही साटं लावावे.
- या जोड पोळीची गुंडाळी करावी व
- १ इंचाचे आडवे चौकोनी तुकडे पाडावेत.
- नंतर प्रत्येक तुकडा पोळपाटावर ठेवून त्या बाजूने कापलेला असेल त्या दिशेने उभा लाटावा.
- जाड बुडाच्या कढईत थोडे जास्त तळणासाठी तूप घेऊन प्रत्येक तुकडा मंद तळावा.
- तळताना दोन्ही बाजू दाबून त्यावर पळीने कढईतील तूप हळूहळू घालावे.
- म्हणजे चिरोटे फुगून वळकटीप्रमाणे गोल होतो.
- गार झाल्यावर साखरेचा पक्का पाक करून एक चमचा पाक चिरोट्याच्या तोंडाकडील बाजूने चिरोट्यावर घालावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.