खजूर काजू कतली रेसीपी मराठी | काजू कतली बरफी | Khajur Burfi | Sugar Free Dates and Dry Fruit Roll | Khajur and Nuts Burfi | Khajur Burfi Recipe | Khajur and Dry Fruit Burfi | Kaju Katli Recipe in Marathi | Rakhi special burfi Recipe | Cashew Barfi
साहित्य:-
- १ पाव बिया काढलेला खजूर.
- अर्धी वाटी साय,
- दोन टी स्पून बदाम पावडर,
- १०० ग्रॅम काजू पूड,
- १ वाटी दुधाची पावडर,
- दीड वाटी पिठीसाखर,
- १ टी स्पून वेलची पूड,
- थोडं पाणी.
कृती:-
- प्रथम खजूर चिरून मिक्सरमध्ये थोडा बारीक करावा.
- नंतर एका जाड बुडाच्या कढईत घालून त्यात साय मिसळावी व
- मोठ्या डावाने दाबून चांगला घोटून एकजीव करावा.
- कढई खाली उतरवून त्यात बदाम पावडर मिसळून गोळा मळावा.
- त्यानंतर पिठीसाखर व दुधाची पावडर एकत्र करून ते भांड उकळत्या पाण्याच्या पातेल्यावर पाच-सात मिनिटं धरावं.
- नंतर त्यात चाळलेली काजू पावडर घालून गोळा करावा.
- गोळ्यात वेलचीपूड घालून गोळा चांगला मळावा.
- घट्ट झाल्यास थोडं पाणी लावून मळावा.
- त्यानंतर पोळपाटाला तूप लावून त्यावर खजूराची (गोळ्याची) लहान पोळी लाटावी.
- ती पोळी बाजूला ठेवून तेवढीच काजूच्या गोळ्याची पण लहान पोळी लाटावी.
- मग काजू पोळी खजूर पोळीवर ठेवून दोन्ही एकत्र लाटावीत.
- नंतर वर्ख लावून वड्या कापाव्यात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.