लिची स्नो ड्रिंक रेसीपी मराठीत | मॉकटेल | Lychee / Litchi Snow Drink Recipe in Marathi | Summer Drink | Mocktail
साहित्य -
- २०० ग्रॅम घरी बनवलेलं पनीर,
- १ टे. स्पू. पिठीसाखर,
- ५-६ लिची.
- २ ग्लास लिचीचं ज्यूस,
- २५० मिलिलीटर सोडा वॉटर किंवा
- दोन वाट्या कोला आणि
- बर्फाचा चुरा.
कृती -
- लिची सोलून त्यातल्या बिया काढून घ्याव्या.
- लिचीचे लहान लहान काप करून हे काप फ्रीजमध्ये ठेवावे.
- पनीर परातीत घेऊन त्यात पिठीसाखर टाकून ते हलकं होईपर्यंत फेटावं.
- पनिराचे लहान लहान गोळे तयार करावे.
- हातात पनिराचा गोळा घेऊन थोडा चपटा करावा.
- त्यात लिचीचे एक एक काप ठेवून गोळ्याची पारी बंद करावी.
- या प्रकारे पनिराचे गोळे बनवून फ्रीजमध्ये ठेवावे.
- लिचीचे ज्यूस, सोडा वॉटर फ्रीजमध्ये ठेवून थंड करावं.
- मोठ्या उंच ग्लासमध्ये लिचीचं ज्यूस, बर्फाचा चुरा, २-३ पनिराचे छोटे छोटे गोळे क्रमानं टाकावे.
- वरून सोडा वॉटर किंवा कोला टाकून लिची स्नो ड्रिंक लगेच पिण्यास द्यावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.