स्वीट आणि फ्रेश लाइम सोडा रेसीपी मराठीत | Sweet and Fresh Lime Soda Recipe in Marathi
साहित्य -
- दोन लिंबांचा रस,
- चवीनुसार साखर,
- चिमूटभर वेलची पूड,
- २-३ केशर काड्या,
- दोन कप क्लब सोडा,
- सजावटीसाठी पुदिन्याची पानं,
- लिंबाचे पातळ काप आणि
- बर्फाचा चुरा.
कृती -
- लिंबाच्या रसात साखर घालून मिश्रण एकत्र करावं.
- साखर विरघळल्यावर त्यात वेलची पूड, केशर काड्या घाला
- हे मिश्रण दोन-तीन ग्लासांमध्ये समप्रमाणात टाकून त्यात बर्फाचा चुरा घालावा.
- लिंबाच्या कापेला पातळ चीर देऊन ती ग्लासवर लावावी.
- त्यानंतर ग्लासमध्ये क्लब सोडा ओतावा हे मिश्रण व्यवस्थित चमच्यानं ढवळून घ्यावं.
- त्यात पुदिन्याची पानं घालून ते लगेच पिण्यास द्यावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.