सॉल्टी फ्रुटी ड्रिंक रेसीपी मराठीत | मॉकटेल | सरबत | Salty Fruit Drink Recipe in Marathi | Mocktail | Sharabat
साहित्य -
- सत्राचं व अननसाचं सरबत प्रत्येकी एक एक ग्लास,
- चार टे. स्पू. स्ट्रॉबेरी क्रश,
- १ वाटी कापलेली काळी द्राक्षं,
- १ वाटी पुदिन्याची पानं किंवा गुलाब पाकळ्या,
- बर्फाचा चुरा
- नारळाचं दूध,
- काळी मिरी पूड
- साखर चवीनुसार,
- काळं मीठ,
- साधं मीठ
- लिम्का.
कृती -
- संत्र्याचा व अननसाचा रस, स्ट्राबेरी क्रश, नारळाचं दूध गरजेनुसार साखर, मिरपूड, दोन्ही मीठ चवीप्रमाणे टाकून एकत्र करुन हालवावं,
- त्यात पुदिना किंवा गुलाब पाकळ्या बारीक चिरून घालाव्या.
- सर्व मिश्रण चांगलं थंड करावं,
- ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालावा.
- त्यावर मिश्रण घालावं.
- वरून लिम्का घालून लगेच पिण्यास द्यावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.