थंडाई रेसीपी मराठीत | Thandai Recipe in Marathi
साहित्य :
- बदामबी १००ग्रॅ.,
- पिस्ता २५ ग्रॅ.,
- खसखस,
- बडीशेप ४ टेबलस्पून,
- गुलकंद २ टे.स्पू. - (देशी गुलाबपाकळ्या अर्धी वाटी),
- काळी मिरी १ टे.स्पू.,
- चिमुटभर वेलचीपूड,
- केशर,
- ४ वाट्या साखर,
- २ लीटर दुध
कृती-
- दूध तापवून गार करावे.
- दुधावरील साय काढून घ्यावी.
- बदामबी, पिस्ता, खसखस वेगवेगळे गरम पाण्यात ४ ते. ५ तास भिजवून ठेवावे.
- बदामाची साले काढावीत,
- बडीशेप, काळी मिरी, गुलाबपाकळ्या चटणीकटरमधून काढून बारीक पूड करावी.
- बदाम, पिस्ते, खसखस मिक्सरमधुन काढ्न पेस्ट करावी.
- वाटलेली पेस्ट, बारीक पूड, साखर गार दुधात घालुन मिक्सर मधुन फिरवावे.
- गाळणीतून गाळून परत तो मसाला दुधात घालून मिक्सरमधून फिरवावे.
- पुन्हा गाळावे.
- असे दोन-तीनदा केल्यास मसाल्याचा पूर्ण अर्क दुधात उतरेल.
- नंतर त्यात केशर, वेलचीपुड घालून फ्रिजमध्ये गार 1 करण्यास ठेवावे.
- थोडीशी तिखट-गोड थंड थंडाई हे वेगळे पेय उन्हाळ्यातही छान लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.