रव्याचा ढोकळा रेसीपी मराठी | झटपट आणि फटाफट रवा ढोकळा | झटपट रवा ढोकळा | हेल्दी, झटपट रवा ढोकळा | रव्याचा मऊ मऊ व स्पंजी ढोकळा | रवा ढोकळा रेसिपी मराठीमध्ये | Rava dhokla Recipe in Marathi | Ravyacha dhokla | Rava Dhokla Recipe | Instant Sooji Dhokla | Suji Ka Dhokla | Instant Rava Dhokla | How to make Rava Dhokla
आयुर्वेद शास्त्राने आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.
(आमसूल + बीटाच्या चटणीसोबत) जेवणामध्ये रुची वाढविणारा व अगदी १५-२० मि. तयार होणारा हा ढोकळा.
साहित्य :
- अर्धा किलो रवा,
- आंबट ताक,
- कोथिंबीर,
- खाण्याचा सोडा,
- फोडणीसाठी तेल,
- मोहरी,
- जिरे,
- तीळ,
- हिरव्या मिरच्या,
- कढिलिंब
कृती:
- ताकामध्ये रवा, मीठ टाकावे.
- या अगोदरच ढोकळा पात्र गॅसवर ठेवून द्यावे.
- नंतर मिश्रणामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून चांगले फेटावे.
- मिश्रण हलके झाल्यावर तेल लावलेल्या पात्रात टाकून झाकण ठेवावे.
- १० मिनिटांनी ढोकळा झाला का बघावे,
- अन्यथा अजून ५ मि. राहू द्यावे.
- थोडा थंड झाल्यावर तुकडे पाडून घ्यावे,
- वरून फोडणी घालावी.
चटणी :
- ३-४ कोकम + अर्धा बीट,
- मीठ,
- तिखट,
- जिरेपूड,
साहित्य:
- बीटचे तुकडे करून वाफवून घ्यावे.
- त्यामध्येच कोकम टाकावे.
- थोडे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये मीठ, तिखट, जिरे पूड घालून पेस्ट करावी.
- अशा प्रकारचा ढोकळा व चटणी पौष्टिक मूल्य देणारा आहे. या ढोकळ्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होणार नाही.
- आमसूल चिंचेपेक्षा श्रेष्ठ आहे.
- ते पित्तशामक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.