स्वीट कॉर्नच्या तिखट वड्या रेसीपी मराठी | Sweet Corn Spicy Vadya Recipe in Marathi | Sweet Corn Recipe
आयुर्वेद शास्त्राने
आहारामध्ये षडरसांचा अंतर्भाव सांगितला आहे. म्हणून आपण गृहिणींनी या मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट व तुरट सहा (रसांच्या) चवींचा उपयोग पदार्थांमध्ये करायला हवा. ही योजना सकाळपासून रात्रीपर्यंतच्या आहारामध्ये करता येते. या सहा रसयुक्त पदार्थामधूनच सर्व पोषक घटक मिळत असतात. पिष्ठमय पदार्थ, प्रथिने, स्नेह, खनिज, जीवनसत्वे यांचा आपोआपच अंतर्भाव होत जातो. स्त्रियांमध्ये विविध पदार्थ करण्याची कल्पकता असते. मला आवडणाऱ्या, मुलांना पोषक मूल्य देणाऱ्या काही पाककृती देत आहे, त्या रुची तर वाढवतीलच शिवाय पोषणही करतील.
हल्ली कोवळी मक्याची कणसे सहजच मिळतात. अशा कणसांच्या या वड्या जेवणामध्ये विविधता आणतात.
साहित्य :
- २ मक्याची कणसे (कोवळी) साधारण आकाराची,
- अर्धी वाटी डाळीचे पीठ,
- १ च. लिंबाचा रस,
- हळद,
- तिखट,
- मीठ,
- खोबऱ्याचा किस,
- तेल/तूप.
कृती :
- कणसे किसून घ्यावी.
- फोडणीसाठी तेलापेक्षा तूप योग्य.
- त्यामध्ये जिरे, हळद टाकून कणसांची पेस्ट टाकावी.
- त्यानंतर डाळीचे पीठ, मीठ, तिखट, लिंबाचा रस घालून एक वाफ आणावी.
- परत चांगली वाफ आल्यावर ताटलीला तेल/तूप लावून त्यावर गोळा पसरवून थापावा.
- वड्या पाडल्यावर, पूर्वी खोबऱ्याचा किस टाकावा.
- यासोबतच आमसूल (३-४) भिवजलेले व पेंडखजूर (३-४) याची चटणी खाल्ल्यास अॅसिडीटी होणार नाही.
- मधुर, तूरट रस मिळून पौष्टिकता मिळू शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.