तिळाची चटणी रेसिपी मराठीत | Tilachi Chutney Recipe in Marathi | Sesame Seeds Chutney | Sesame Seeds recipe
तिळाची खुसखुशीत चटणी (न कुटता)
साहित्य:-
- अर्धी वाटी तीळ भाजलेले,
- दोन टी स्पून तेल, फोडणीसाठी
- मोहरी,
- जिरं,
- बारीक चिरलेला कढीपत्ता,
- २ चमचे जाडसर दाण्याचा कूट,
- तिखट,
- मीठ अंदाजे.
कृती:-
- लहान कढईमध्ये प्रथम फोडणी करून घ्यावी.
- गरम फोडणीवर भाजलेले तीळ घालावेत,
- दाण्याचा कूट घालावा
- व २ चमचे तिखट, अंदाजे मीठ घालावे,
- हलवून गॅस बंद करावा
- व लगेचच चटणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढावी.
- नाहीतर तिखट जळण्याची शक्यता असते.
- कुरकुरीत चटणी तोंडी लावणं म्हणून जेवताना वाढावी.
- बाजरीच्या भाकरीसोबत अधिक रुचकर लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.