अननसाचं (केरळी) लोणचं रेसीपी मराठी | अननस लोणचे | Pineapple Pickles Recipe in Marathi
साहित्य-
- ३ वाट्या कच्च्या आंबट अननसाच्या फोडी,
- ४ चमचे साखर किंवा गूळ,
- १ चमचा मीठ,
- पाव वाटी तेल,
- प्रत्येकी १ चमचा लवंग,
- दालचिनी
- काळे मिरे
- लाल मिरच्यांचे तुकडे किंवा लाल तिखट
कृती-
- प्रथम सर्व मसाले बारीक वाटावे.
- अननसाच्या फोडी वाफवून घ्याव्यात.
- मग कढईत टाकून त्यात गूळ/साखर, मीठ घालून पाणी आटवावं व
- त्यात परतलेला मसाला मिश्रण घालावं
- जरा ढवळून जॅमइतपत घट्ट झालं की उतरवून गार करून बरणीत भरावं.
- हे लाेणच्या कैरीच्या लोणच्या प्रमाणे वर्षभर टिकतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.