Halaman

    Social Items

अननसाचा भात रेसीपी मराठी | अननसाचा नारळी भात | अननसाचा गोड भात। पाईनॅपल के मीठे चावल। जर्दा पुलाव |Sweet Narali Bhaat Recipe in Marathi | Rakshabandhan Special | Pineapple Coconut Rice | Sweet Pineapple Rice | Pineapple Zarda Pulao | Pineapple Rice | Ananas Bhaat | Rice Dessert

अननसाचा भात रेसीपी मराठी | अननसाचा नारळी भात | अननसाचा गोड भात। पाईनॅपल के मीठे चावल। जर्दा पुलाव |Sweet Narali Bhaat Recipe in Marathi | Rakshabandhan Special | Pineapple Coconut Rice | Sweet Pineapple Rice | Pineapple Zarda Pulao | Pineapple Rice | Ananas Bhaat |  Rice Dessert





साहित्य-

  • ४ वाट्या चांगल्या प्रतिचा जुना तांदुळ,
  • ६ वाट्या साखर
  • १ वाटी तुप,
  • ५-६ लवंगा,
  • काजू-बदाम बेदाणे भिजवून कोरडे केलेले,
  • १ नारळ,
  • वेलची पूड,
  • थोडासा लेमन कलर,
  • अर्धा किलो चांगला अननस,
  • अननस नसल्यास अननसाचा अर्धा किलोचा बाजारात मिळणारा डबा,
  • चेरी,
  • पिस्ते






कृती-


  • प्रथम अननसाची साल काढून फोडी कराव्यात.
  • त्या नुसत्या शिजवून घ्याव्यात.
  • फोडी बाजूला काढून पाणी तसेच ठेवावे.
  • नंतर तांदूळ स्वच्छ धुवून पाणी काढून तुपावर लवंगा टाकून परतावे.
  • त्यात अननसाचे शिजवलेले पाणी घालून साखरभाताप्रमाणे भात करून घ्यावा.
  • डब्यातील अननस घेतल्यास त्यातील पाणी प्रथमच न घालता भात अर्धवट शिजल्यावर मग घालावे.
  • कारण त्या पाण्यात थोडी साखर असल्याने आधी घातल्यास भात चागला शिजणार नाही.
  • भात करून घेतल्यावर मग साखर व खोवलेले ओले खोबरे शिजवून घेऊन त्यात लेमन कलर टाकून त्यात शिजवलेला भात अननसाच्या निम्म्या फोडी घालून साखरभाताप्रमाणेच बाकीची कृती करावी.
  • (साखर भातातील पाणी आटल्यावर भात मोकळा झाल्यावर निखाऱ्यावर किंवा मंद आचेवर वाफ आणण्याकरिता ठेवावा.)
  • वाफ आल्यावर भात भांड्यात काढून त्यावर उरलेल्या अननसाच्या फोडी, काजू बदाम काप, पिस्ते, बेदाणे व चेरी व वेलची पूड मिसळावी.
  • वरून सजवावे. अननसाच्या भातात अननसाचा थोडा इसेन्सही घालावा. हा भात फारच चवदार लागतो व नेहमीच्या भातापेक्षा आकर्षक दिसतो.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.