अननसाची भाजी (केरळी) रेसीपी मराठी | Pineapple Bhaji Recipe in Marathi | Ananas Bhaji
साहित्य-
- २ वाट्या अननसाच्या फोडी,
- १ वाटी ओलं खोबरं,
- १ चमचा जिरे,
- हळद,
- २ वाट्या दही,
- मीठ,
- उभे चिरलेले कांदे अर्धी वाटी.
फोडणीचे साहित्य
- लाल मिरच्या २.
कृती-
- १ वाटी पाण्यात हळद घालून त्यात अननसाच्या फोडी शिजवाव्यात.
- खोबरे व जिरे बारीक वाटून त्यात टाकावे.
- सर्व मिसळून चांगली वाफ आणावी.
- त्यात दही व मीठ घालावं.
- कढईत तेलाची फोडणी करून लाल मिरच्या टाकून त्यात कांदा परतावा आणि
- शिजलेल्या भाजीत मिसळवा.
- सर्व हळूहळू एकत्र करावे.
- ही भाजी भाताबरोबर चांगली लागते.
- सोबत पापड भाजुन द्यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.