कैरी लोणचे । Mango Pickle North Indian Style Recipe in Marathi | How to make Mango Achar
लोणचे- उत्तर हिंदुस्थानी पद्धत
कोणत्याही पदार्थाचे लोणचे घालता येते आणि ते चविष्टही लागते. तथापि, कैरीचा आंबटपणा जरा जास्तच, सर्वांना आवडतो म्हणूनच 'लोणचं' शब्द उच्चारताच डोळ्यासमोर येते ती लालभडक खारात आणि तेलात बुडालेली कैरीचीच फोड. कैरीचे लोणचे आवडत नाही, असं सहसा होत नाही.
साहित्य:-
- काळसर सालीच्या बाठ बाधलेल्या गोलाकार कैऱ्या ५ किलो,
- प्रत्येकी १०० ग्रॅम जाड बडीशेप,
- कलौंजी (कोटाचे बी),
- लाल तिखट,
- मेथीदाणा,
- हळद,
- मीठ अंदाजे ८०० ग्रॅम,
- मोहरीचे तेल दीड किलो,
- हिंग
कृती:-
टीप:-
या लोणच्यात मोहरी नसल्यामळे ते खराब होण्याची शक्यता कमी असते.
- कैऱ्या धुवून-पुसून त्याच्या शक्यतो बाठीसकट जरा मोठ्या आकाराच्या फोडी कराव्यात.
- एका बरणीत जरा जास्त मीठ व दोन चमचे हळद घालून, त्या फोडी त्यात घालून बरणी चांगली हलवावी.
- झाकण बंद करून रात्रभर ठेवावी.
- सकाळी त्या फोडींना खूप पाणी सुटेल.
- तेव्हा एका स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या चाळणीवर त्या फोडी ओताव्यात.
- पाणी पूर्ण निथळून जाऊ द्यावे.
- नंतर एका पांढ-या फडक्यावर त्या फोडी तास दीड तास उन्हात वर पातळ कपडा घालून सुकु द्याव्यात.
- फोडींचे पाणी पुर्ण सुकले गेले पाहिजे.
- मेथीदाणा, बडीशेप आणि कलौंजी थोडी जाडसर दळुन (मिक्सरमधून) घ्यावी.
- एका मोठया परातीत हा दळलेला मसाला, मीठ, हळद व तिखट, हिंग सर्व एकत्र करून घ्यावे.
- त्यात आंब्याच्या फोडी थोड्या-थोड्या करून मिसळाव्यात
- व बरणीत भरून ठेवावे.
- मोहरीचे तेल धूर निघेपर्यंत गरम करावे.
- गॅस बंद करावा.
- तेल पूर्ण थंड होऊ द्यावे
- व मग बरणीत लोणच्यावर ओतावे.
- सर्व फोडी तेलात बुडालेल्या राहतील, इतके तेल लोणच्यात असले पाहिजे.
टीप:-
या लोणच्यात मोहरी नसल्यामळे ते खराब होण्याची शक्यता कमी असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.