बाळ कैऱ्यांचे भरले लोणचे |
बाळ कैरीचे लोणचे | Bal Kairiche Lonche recipe in Marathi | Baby Raw Mango Pickles
साहित्य-
- लहान कैऱ्या १ किलो,
- मोहरी पुड १ वाटी,
- २२५ ग्रॅ. मीठ किंवा चवीनुसार,
- कलौंजी २ टे. स्पू.,
- बडी शैव दोन टे. स्पू.
- २ टी. स्पू.गरम मसाला,
- १/२ टी. स्पू. हिंग,
- हळद,
- लाल तिखट,
- तिळाचे तेल.
कृती-
- कैऱ्या धुऊन कोरडी करा,
- भरलेले वाग्याप्रमाणे चिरुन घ्या
- आतील काेय काढून घ्या.
- बडीशेप-कलौंजीची भरडपुड करा
- तेल गरम करायला ठेवा.
- सर्व मसाले आणि मीठ एकत्र करून त्यावर थोडे गरम तेल टाका.
- मसाला कालवुन कैऱ्यात भरा,
- बरणीत कैऱ्या ठेवा.
- उरलेला मसाला वरून टाका व मिक्स करा
- नंतर तेल टाका.
- २ दिवस उन्हात ठेवा.
- मधुन-मधून ढवळा.
- ८-१० दिवसात खाण्यासाठी तयार होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.