भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe in Marathi| How to make Vegetable Pickle | Achar २
साहित्य-
- एक मध्यम आकाराचे फूल कोबीचा गड्डा,
- चार गाजरे,
- एक मुळा,
- तीन चार हिरव्या मिरच्या,
- आल्याचा मोठा तुकडा.
- एक पाव शलगम,
- पाच-सात आवळे,
- शंभर ग्रॅम गुळ,
- एक वाटी मोहरीची डाळ.
- एक चमचा मेथी दाणा,
- हिंग,
- पावशेर मोहरीचे तेल,
- पाव वाटी,
- लाल तिखट,
- पाच-सहा चमचे हळद,
- एक चमचा मोहरी,
- एक कप व्हिनिगर.
भाज्यांचे लोणचे । Mixed Vegetable Pickle Recipe | How to make Vegetable Pickle | Achar २ |
कृती-
- सर्व भाज्या धुवून पुसून त्यांचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करा.
- एक मोठी चिनीमातीची बरणी घेऊन त्यात पाणी व भरपूर मीठ घालावे.
- व भाजीचे केलेले सर्व तुकडे त्या पाण्यात टाकून तीन दिवसापर्यंत झाकून ठेवावे.
- तिसऱ्या दिवशी त्यातले पाणी काढून फेकून द्या
- व एका मोठ्या भांड्यात सर्व भाज्या दोन-तीनदा पाणी टाकून चांगले खळखळून धुवून घ्या.
- चाळणीवर निथळत ठेवा.
- नंतर एका पांढऱ्या स्वच्छ कपड्यावर त्या भाज्या सावलीतच पसरून चार-पाच तास सुकू द्यावे.
- कढईत एक छोटा चमचा तेल घाला
- त्यात मेथीदाणा व हिंग तळून घ्या.
- मिक्सरमधून मेथीदाणा, हिंग व मोहरीची डाळ (जाड असल्यास) एक मिनिट फिरवून बारीक करा.
- एका मोठ्या प्लेट मध्ये तिखट, हळद, मीठ, हिंग, मेथी दाणे व मोहरीची पूड मिक्स करून त्याचे गोलाकार आळे सारखे बनवा.
- कढईत मोहरीचे तेल घाला.
- गॅसवर ठेवा.
- त्यातून वाफ/धुर येईल इतके ते तापवा,
- गॅस बंद करा.
- तेलाचा पूर्ण धूर निघून जाऊ द्या.
- त्यात एक चमचा मोहरी, हिंग व हळद घाला
- ते गरम तेल परातीतल्या मसाल्यावर ओता.
- चमच्याने सर्व मसाला तेलात एकत्र करा.
- पूर्ण थंड होऊ द्या.
- थोड्या थोड्या करुन भाज्या घेऊन मसाल्यात मिक्स करून बरणीत भरत जावे.
- शेवटी गुळाचा खडा बारीक करून व एक मोठा कप व्हिनेगर टाकून मिक्स करा.
- हलवून बरणी बंद करा.
- एक दिवसानंतर खाण्यास घ्या.
- व्यवस्थित ठेवले तर हे लोणचे खूप दिवस टिकते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.