तांदुळाच्या पिठाची उकडपेंडी । Tandudachya Pithachi Ukadpendi | How to make Rice Flour Ukadpendi Recipe in Marathi
साहित्य –
- १ वाटी तांदळाचे पीठ,
- बारीक चिरलेला कांदा,
- १ हिरवी मिरची,
- कढीपत्ता,
- किसलेले आले,
फोडणीचे साहित्य
- तिखट,
- हळद,
- मीठ,
- चवीला दही,
- गरम पाणी अंदाजे,
- साखर,
- कोथिंबीर,
- खोबऱ्याचा कीस,
- हिंग.
तांदुळाच्या पिठाची उकडपेंडी । Tandudachya Pithachi Ukadpendi | How to make Rice Flour Ukadpendi Recipe |
कृती -
- एका कढईत तेल टाकून गरम होऊ द्यावे.
- तेलात हिंग, कढीपत्ता, मिरच्याचे बारीक केलेले तुकडे, बारीक चिरलेला कांदा, जिरे, तांदळाचे पीठ टाकून खमंग भाजावे.
- नंतर त्यात थोडे लाल तिखट, हळद, मीठ टाकावे व चांगले मिसळावे.
- त्यात गरम केलेले पाणी किंवा ताक (ताक नसल्यास लिंबाचा रस), टाकून उकडपेंडी चांगली मऊ व मोकळी शिजवावी.
- वाफ आल्यावर वरून कोथिंबीर टाकावी
- व सर्व्ह करताना खोबऱ्याचा कीस टाकावा.
- आवडत असल्यास वरून बारीक शेव व बारीक कांदा टाकावा म्हणजे चव येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.