कांदा कैरी लोणचे रेसीपी मराठीत | Kanda kairi lonche Recipe in Marathi| onion raw mango pickle | Onion Pickle | Mango Onion Pickle | Easy & Instant
साहित्य-
- १० ते १२ लहान लहान आकारातील कांदे,
- १ वाटी कैरी किसुन,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- हिंग,
- लाल मिरचीचे तुकडे ५ ते ६,
- २ चमचे मोहरीची पूड,
- मेथीपूड अर्धा चमच.
- तेल डावभर,
कृती-
- प्रथम कांद्याची साल काढून कांदा भरण्यासाठी कापून घ्या.
- कैरीची साल काढून किसून घ्या.
- तिखट, मीठ, हळद, मोहरीची पूड एकत्र करा.
- तेलावर कांदे वाफवून घ्या व
- थंड करायला ठेवा.
- दुसर्या कढईत तेल, हिंग व लाल मिरचीचे तुकडे घाला,
- मेथीपूड घाला.
- परता.
- गरम फोडणी मसाल्यावर ओता,
- चांगले हलवून थंड झाल्यावर कांदे व कैरीचा कीस एकत्र करून घाला व
- चांगले मिसळून बॉटलमध्ये ठेवा.
- दोन-तीन दिवस ताजे ताजे लोणचे फ्रीजमध्येच ठेवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.