Halaman

    Social Items

Festival लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Festival लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पालक शेव रेसीपी मराठी | कुरकुरीत पालक शेव | कुरकुरीत पालक शेव बड़े ही आसान तरीके से पालक सेव | विकतच्या नमकीनला पर्याय खमंग कुरकुरीत अशी पालक शेव | Palak shev Recipe in Marathi | Palak Sev | Quick Snack Recipe | Diwali Special Snacks Recipe | Homemade Crispy Sev Recipe | Tasty and Crispy | Spinach Sev Recipe | How to Make Palak Sev | Spinach Sev Diwali Special

मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal



हा गोड पदार्थ गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. मोठ्या सणाला 'हा पदार्थ हमखास तेथे केला जातो.



साहित्य :


  • एक किलो हरभरा डाळीचा रवा,
  • तूप अर्धा किलो,
  • साखर,
  • वेलची
  • जायफळ पूड,
  • केशरी रंग,
  • दूध.


मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal
मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal



कृती :


  • हरभऱ्याची डाळ थोडी भाजून त्याचा गिरणीतून रवा काढावा.
  • सर्व पीठ चाळून घ्यावे.
  • या पिठात थोडे तूप, दूध घालून सर्व पीठ हाताने एकसारखे कालवून घ्यावे.
  • एका मोठ्या कढईत जरा जास्त तुपावर हे पीठ गुलाबी रंगावर, खमंग वास येईपर्यंत भाजावे.
  • नंतर त्यावर दुधाचा शिपका घालावा.
  • पीठ झार्याने हलवावे म्हणजे ते फुलून येईल.
  • एका पातेल्यात तीन-चार वाट्या साखर घालून ती भिजेल एवढे पाणी घालून दोन तारी पाक करावा.
  • त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालावी.
  • केशरी रंगही घालावा.
  • भाजलेला रवाही घालावा.
  • चांगले हलवावे.
  • थाळीला तूप लावून हे मिश्रण त्यात ओतावे.
  • काजू बदाम कापानी सजवावे.
  • मिश्रण गरम असतानाच वड्या पाडाव्यात.

मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal

कॉर्नफ्लेक्स चिवडा नमकीन | Cornflakes Chivda Namkeen in Marathi



साहित्य -

  • कॉर्नफ्लेक्स ५ वाटी,
  • शेंगदाणे १/२ वाटी,
  • डाळ्या १ वाटी,
  • सुके खोबरे काप १/२ वाटी,
  • काजू २ चमचे,
  • खसखस १ चमचा,
  • तीळ १ चमचा,
  • ओवा,
  • धने,
  • जिरे,
  • बडीशोप प्रत्येकी १ चमचा पूड,
  • चिरलेली हिरवी मिर्ची ४ चमचे,
  • चिरलेला कढीपत्ता २ चमचे,
  • आमचूर ३ चमचे,
  • तिखट,
  • मिठ चवीनुसार,
  • हळद,
  • पिठी साखर २ चमचे,
  • तेल २ डाव,


कॉर्नफ्लेक्स चिवडा  Cornflakes Chivda Namkeen
कॉर्नफ्लेक्स चिवडा  Cornflakes Chivda Namkeen


कृती-

  • शेंगदाणे, डाळ्या, खोबरे काप, काजू गरम तेलात तळून घ्या.
  • गॅसवर कढईत तेलात फोडणी तडतडल्यावर त्यात हिरवी मिर्ची, कढीपत्ता घाला.
  • नंतर खसखस, तीळ, तिखट, मीठ, हळद घालून गॅस बंद करा.
  • मोठ्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लेक्स काढा.
  • त्यात वरील साहित्य व पिठी साखर, सर्व पावडर घालून मिक्स करा.
  • झाला झटपट खमंग चिवडा तयार.



टीप-

कॉर्नफ्लेक्स भाजू किंवा तळू नये.

कॉर्नफ्लेक्स चिवडा नमकीन | Cornflakes Chivda Namkeen in Marathi

पातळ पोहा चिवडा | Patal 

Poha Chivda Recipe in Marathi


पातळ/कागदी पोहे चिवडा | Patal/kagdi Pohe Chivda Recipe in Marathi
पातळ/कागदी पोहे चिवडा | Patal/kagdi Pohe Chivda Recipe in Marathi



साहित्य- 


  • ५०० ग्रॅम पातळ पोहे,
  • ५० ग्रॅम बाल्या, 
  • ५० ग्रॅम खोबरे काप,
  • १०० ग्रॅम शेंगदाणे,
  • चिरलेली हिरवी मिरची,
  • कढीलिंबाची पाने,
  • मीठ,
  • पिठीसाखर,
  • तेल,
  • हळद,
  • हिंग,
  • तीळ.


कृती-

  • पोहे ३-४ तास उन्हात ठेवावे किंवा कढईत कोरडेच भाजुन घ्यावे. 
  • तेल घालून जिरे, तीळमोहरीहिंगहळदकढी लिंबाची पानेहिरव्या मिरच्या फोडणी करा. 
  • शेंगदाणे, डाळ्या, खोबर्याचे केलेले काप थोड्या तेलात परतून घ्यावे. 
  • पोहे घालून मिक्स करावेत. 
  • थोडे ढवळावे. 
  • गॅस बंद करून पिठीसाखर मिक्स करून गार करावे. 
  • हवाबंद डब्यात ठेवावे. 



पातळ पोहा चिवडा | Patal Poha Chivda Recipe in Marathi


मक्याचा चिवडा | How to Make Corn 

Flakes Chivada Recipe in 

Marathi| Makyacha Chivada



मक्याचा चिवडा  How to Make Corn  Flakes Chivada Recipe  Makyacha  Chivada
मक्याचा चिवडा  How to Make Corn  Flakes Chivada Recipe  Makyacha  Chivada



साहित्य-



  • २०० ग्रॅम कॉर्न पोहे,
  • एक वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,
  • एक वाटी डाळ्या,
  • एक वाटी खोबरे काप,
  • अर्धी वाटी काजू काप,
  • लाल तिखट,
  • मीठ,
  • पिठीसाखर,
  • तीळ,
  • आमचूर पावडर,
  • कढीलिंबाचे पाने,
  • तेल बडीशेप भरडलेला,
  • हळद



कृती-



  • जाड बुडाच्या पातेल्यात तेल टाकावे.
  • नंतर त्यात मोहरीतीळकढीलिंबाचे पानेहळद घालून
  • गडणी करून काजूखोबरे कापडाळ्याशेंगदाण घालून परतावे. मीठलाल तिखटआमचूर पावडरबडीशेप भरडपिठीसाखर घालून हलवावे.
  • गॅस बंद करून कॉर्न पोहे घालून नीट मिसळावे.

मक्याचा चिवडा | How to Make Corn Flakes Chivada Recipe in Marathi | Makyacha Chivada

ओल्या खोबऱ्याचे लाडू । Coconut Laddu | How to Make Coconut Ladu in Marathi




साहित्य- 



  • ओल्या नारळाचा चव दोन वाटी,
  • एक टे.स्पू. तूप,
  • साखरदोन वाटी,
  • एक वाटी मावा,
  • वेलची पूड,
  • बेदाणे,
  • ड्रायफ्रूटस् काप.




ओल्या खोबऱ्याचे लाडू । Coconut Laddu  How to Make Coconut Ladu
ओल्या खोबऱ्याचे लाडू । Coconut Laddu  How to Make Coconut Ladu




कृती- 



  • कढईत तुपात मंद आचेवर नारळाचा चव परतून घ्यावा. 
  • मावा टाकून तोही गुलाबी रंगांवर परतून घ्यावा. 
  • साखरेचा एकतारी पाक करून त्यात नारळाचा चव-मावा टाकावा. 
  • वेलची पूड बेदाणे, ड्रायफूटस्चे काप टाकून एकसारखे हलवत रहावे. मिश्रणाचा गोळा होत आला की गॅस बंद करून लाडू वळवता आल्यावर लाडू वळावेत.

ओल्या खोबऱ्याचे लाडू । Coconut Laddu | How to Make Coconut Ladu in Marathi


Chakli Recipe | How to make Chakli Recipe | Diwali Recipe | चकलीची भाजणी

प्रकार-१

साहित्य-

 ५०० ग्रॅम तांदूळ, २५० ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम उडीद डाळ, १२५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार-२

साहित्य- 

६०० ग्रॅम तांदूळ, २०० ग्रॅम हरभरा डाळ, १५० ग्रॅम उडीद डाळ, ७५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार -३

साहित्य -

चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, दोन वाटी पंढरपुरी डाळ्या, अर्धी वाटी जिरे, एक वाटी पोहे, दोन टे.स्पू. मेथी दाणे.


प्रकार-४

साहित्य- 

५०० ग्रॅम ज्वारी, २५० ग्रॅम हरभरा डाळ, २०० ग्रॅम उडीद दाळ, १०० ग्रॅम मुगाची डाळ, अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी धणे.


प्रकार-५

साहित्य- 

५०० ग्रॅम तांदूळ, १५० ग्रॅम उडीद डाळ, १५० ग्रॅम हरभरा डाळ, ५० ग्रॅम मुगाची डाळ, २०० ग्रॅम ज्वारी, ५० ग्रॅम जिरे, ५० ग्रॅम धणे.


कृती- 

      वरील सर्व प्रकारांत डाळी व तांदूळ वेगवेगळे मंद आचेवर भाजून एकत्र करून दळून आणावेत. ज्या प्रकारात ज्वारी आहे- ज्वारीला पाण्याचा हात लावून सडून घ्यावी. नंतर भाजावी. वेगळी भाजून नंतर एकत्र करून दळून आणावे. भाजणी दळून आणल्यावर चकली करतेवेळी-




Chakli Recipe  How to make Chakli Recipe  Diwali Recipe
Chakli Recipe  How to make Chakli Recipe  Diwali Recipe



प्रकार-१


       भाजणीत तीळ-ओवा-तिखट-मीठ गरम कडकडीत मोहन घालून नीट मिक्स करून गरम पाण्याने पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. पीठ मळून घ्यावे.

प्रकार -२


      जाड बुडाच्या पातेल्यात जेवढी भाजणी पीठ घ्यायचे आहे तेवढेच पाणी मोजून घ्यावे व गॅसवर ठेवावे. पाण्यातच तिखट-मीठ, हळद, ओवा, तीळ, मोहन घालावे. पाण्याला उकडी आली की गॅस बंद करून त्यात पीठ घालावे. नीट ढवळुन मिक्स करावे. दोन तास झाकून ठेवावे. पीठ मळन घ्यावे.

      पीठ तयार झाल्यावर चकल्या घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदावर सोऱ्याला चकलीची चकती लावून चकल्या पाडाव्यात. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर चकल्या तळाव्या. तळून कागदावर पसरावी. गार झाल्यावर डब्यात भरावी.



कणकेच्या चकल्या


साहित्य-

२०० ग्रॅम कणीकहळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा, हिंग, तळायला तेल.

कृती-


      पातळ सुती फडक्यात कणकेची सैलसर पुरचुंडी बांधून कुकरमध्ये चाळणीवर ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्यावी. कुकर गार झाल्यावर पीठ काढून परातीत मोकळं कराव. चाळून घ्यावा. तळायचे तेल सोडून सर्व साहित्य घालून पीठ 
पाण्याने मळुन घ्यावा. मोहन घालू नये.
नेहमीप्रमाणे चकल्या कराव्या.



तांदळाच्या पांढऱ्या चकल्या


साहित्य -

       चार वाट्या तांदळाचे पीठ, एक वाटी उडीद डाळीचे पीठ, एक वाटी पांढरे लोणी, मीठ ,एक वाटी ओल्या नारळाचे चव. 

कृती- 


     नारळाचे चव मिक्सरमधून थोडे पाणी टाकून बारीक करून बारीक करून घ्यावेत. सर्व साहित्य एकत्र करून कढईत तेल तापवून नेहमीप्रमाणे चकल्या करा. 










Chakli Recipe | How to make Chakli Recipe in marathi | Diwali Recipe