Palak recipes in Marathi| Indian spinach recipes | Veg palak recipes
पालकाचे प्रकार
- पालकाची टोमॅटो रसातील भाजी
- पालक वडे
- पालकाचे मुटकुळे
- पालकाच्या पुऱ्या
- चटणी
- पालकाची मोकळी भाजी
- पालकाची चटणी
सूचित पाककृती संग्रह:
- चकलीचे वेगवेगळे प्रकार
- तांदळाच्या पांढऱ्या चकल्या
- तांदळाच्या पांढऱ्या चकल्या
- स्पाइसी खट्टा पानी
- आंबट-गोड पाणी
- लिंबूहिंग पाणी
- पुदीनापाणी
- चिंचेची हिंगपाणी
१. पालकाची टोमॅटो रसातील भाजी
साहित्य-
- १ पाव पालक,
- २५० ग्रम पिकलेले लाल टोमॅटो,
- २० ग्रम मसुरीची डाळ,
- १ टेबल स्पून डाळीचे पीठ (बेसन),
- चवीला साखर, मीठ,
- फोडणीचे साहित्य,
- हिरव्या मिरच्या,
- कोथिंबीर,
- हिंग.
कृती-
- पालकांची भाजी निवडून, चिरून स्वच्छ धुवावी.
- कुकरमध्ये पालकाची भाजी व मसुरीची डाळ शिजवावी.
- टोमॅटो कुकरमध्ये निराळे वाफवावे.
- नंतर टोमॅटोचे साल काढून मिक्सरमध्ये बारीक करावे.
- म्हणजे रस तयार होईल.
- तो रस भाजीत टाकून त्याला बेसन लावावे.
- गुठळ्या होऊ देऊ नये.
- भाजीत तीन वाट्या पाणी, मीठ, साखर टाकून चांगले मिसळावे.
- नंतर फोडणी करून त्यात हिंग, मिरच्या टाकून परतवून त्यात वरील भाजी घालावी.
- २-३ उकळ्या आल्या की भाजी खाली उतरवावी.
- ही भाजी चवदार लागते.
२. पालक वडे
साहित्य-
- पालक १ पाव,
- बेसन 3 वाट्या,
- रवा किंवा कणिक १ वाटी,
- दही, (दही नसल्यास लिंबू किंवा चिंच),
- मोहनसाठी तेल ३ चमचे,
- हिरव्या मिरच्या ४-५,
- आले,
- जिरे,
- लसुण ७-८ पाकळ्या,
- कोथिंबीर अर्धा पाव.
- हे सर्व बारीक करावे.
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- चवीला साखर,
- तीळ २ चमचे,
- मोहारी,
- हिंग.
कृती-
- फोडणीच्या साहित्या शिवाय बेसन, रवा (किंवा कणिक), दही, तीळ, तिखट, मीठ, हळद, साखर हे सर्व एकत्र मिसळावे.
- त्यात पालक बारीक चिरून धुवून मिसळावा.
- मोहनासाठी गरम तेल टाकून थोड्या पाण्याने साधारण घट्ट भिजवावे.
- या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे किंवा लांबट सुरळ्या तयार करा
- थोडे तेल लावलेल्या एका भांड्यात ठेवून कुकरमध्ये शिटी न लावता वाफवावेत.
- नंतर कढईत तेल मोहोरी टाकून मोहोरी तडतडल्यावर हिंग टाकून वरील चकत्या मंदाग्नीवर कुरकुरीत होईपर्यंत राहू द्याव्यात.
- मधूनमधून हलक्या हाताने वर खाली कराव्यात.
- म्हणजे सर्व बाजूने लाल होतील.
- हे पालकाचे वेगळ्या प्रकारचे वडे फारच चवदार व दिसण्यास आकर्षक दिसतात.
- कोणत्याही पातळ चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर गरम गरम खाण्यास द्यावे.
३. पालकाचे मुटकुळे
साहित्य-
- पालक,
- कणिक,
- २ चमचे बेसन,
- तेल,
- तिखट,
- ओवा,
- तीळ,
- कोथिंबीर,
- मीठ,
- हळद,
- जिरे.
कृती-
- प्रथम पालक निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरावा.
- नंतर एका कढईत थोडे तेल टाकुन कणिक व बेसण चांगले भाजावे.
- थंड झाल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद, जिरे, ओवा व तीळ टाकून चिरलेला पालक व कोथिंबीर टाकून थोडे मोहन टाकून सर्व मिसळावे.
- थोडा पाण्याचा शिडकावा देऊन शिजवावे
- व चांगले मऊ करून त्याचे मुठीच्या आकाराचे गोळे करावे.
- गॅसवर कढईत थोडे तेल टाकावे.
- नंतर एका वाटीत तेल घेऊन त्यात मुटकुळे बुडवून कढईत सोडावेत
- व झाकण ठेवून मंदाग्नीवर ठेवावेत.
- सर्व बाजूने तेल लागेल असे तेल सोडावे.
- सर्व बाजूने लालसर झाल्यावर कढई खाली उतरवून गरम गरम मुटकुळे चटणीशी खाण्यास द्यावे.
- हे मुटकुळे गारही चांगले लागतात.
- मुलांच्या शाळेच्या डब्यात किंवा प्रवासात नेता येतात.
- चवदार व झटपट पदार्थ आहे.
- भाताबरोबरही वड्याप्रमाणे चांगले लागतात.
४. पालकाच्या पुऱ्या
Palak recipes Indian spinach recipes Veg palak recipes |
साहित्य-
- पालक १ पाव,
- कणिक ३ वाट्या,
- अर्धी वाटी बेसन,
- लसूण ४-५ पाकळ्या,
- तीळ,
- कोथिंबीर,
- तिखट,
- मीठ,
- हळद,
- हिरवी मिरची,
- जिरं,
- आलं व लसूण याची पेस्ट,
- तळण्यासाठी तेल.
कृती-
- प्रथम पालक निवडून (पानं घ्यावीत जाड्या दांड्या घेऊ नये.)
- चिरून स्वच्छ धुवून चांगला उकळून शिजवून घ्यावा.
- नंतर पाणी काढून शिजलेला पालक एका भाड्यात काढावा.
- कणिक व बेसन घेऊन त्यात थोडे गरम तेलाचे मोहन टाकावे.
- नंतर त्यात तिखट, मीठ, हळद, पेस्ट, तीळ, कोथिंबीर बारीक चिरलेली व उकळलेला पालक टाकून सर्व एकत्रित मिसळावे
- व पाण्याने कणकेच्या गोळ्याप्रमाणे भिजवावे.
- नंतर गोळा मऊ करून त्याच्या पुऱ्या (साधारण जाड्या) लाटून गरम तेलात तळाव्यात.
- या पुऱ्या गरम छान लागतात.
- चटणीबरोबर खाण्यास द्याव्यात.
५. चटणी
- १ वाटी मुगाची डाळ,
- १ वाटी चण्याची डाळ,
- अर्धी वाटी किंवा मूठभर उडदाची डाळ,
- लसूण २-३ पाकळ्या,
- जिरं,
- तिखट,
- मीठ,
- थोडी हळद व थोडे तेल.
कृती-
- प्रथम सर्व डाळी कढईत अगदी थोड्या तेलात खमंग, लालसर भाजाव्यात.
- नंतर त्यात जिरं, तिखट, मीठ, हळद, लसूण टाकून मिक्सरमध्ये बारीक करावे.
- ही पावडर एक-दीड महिना बरणीत भरून ठेवली तरी राहते.
- वेळेवर एका बाऊलमध्ये पावडर काढून त्यात दही टाकून त्याला हिंगाची व थोड्या तिखटाची फोडणी करून त्यात मिसळावी.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी ही साधारण पातळ केलेली चटणी पुऱ्याबरोबर चांगली लागते.
६. पालकाची मोकळी भाजी
साहित्य-
- पालक १ पाव,
- मेथीची हिरवी भाजी अर्धा पाव,
- पातीचे कांदे,
- टोमॅटो १,
- कांदा १,
- हिरवी मिरची १,
- बेसन अर्धी वाटी,
- दही (गोड) अर्धी वाटी,
- तिखट,
- मीठ,
- हळद व फोडणीचे साहित्य,
- कोथिंबीर, १-२ लसणाच्या पाकळ्या.
कृती-
- प्रथम पालक व मेथीची भाजी निवडून, बारीक चिरून स्वच्छ धुवावी.
- नंतर पातीचे कांदे, टोमॅटो व १ कांदा बारीक चिरावेत. लसणाच्या पाकळ्यांचे व मिरचीचे तुकडे करावेत.
- नंतर प्रथम कढईत फोडणीकरिता तेल टाकून मोहरी तडतडल्यानंतर त्यात कांदा लसूण, मिरच्या टोमॅटो पातीचे कांदे टाकून चांगले परतावे.
- नंतर त्यात चिरलेला पालक व मेथीची भाजी टाकून चांगले परतावे व त्यात थोडे दही व पाणी टाकावे.
- तिखट, मीठ, हळदही टाकून चांगले शिजू द्यावे.
- शिजल्यावर व पाणी आटल्यावर वरून बेसन भुरभुरावे
- व चांगले एकजीव करून वाफ आणावी.
- वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- ही भाजी भाकरीबरोबर चांगली लागते.
७. पालकाची चटणी
साहित्य-
- पालक १ पाव,
- ४-५ हिरव्या मिरच्या,
- मीठ,
- साखर व लिंबू,
- १ चमचा दाण्याचा कूट.
कृती-
- पालक बारीक चिरून धुवून घ्यावा.
- नंतर तो पाट्यावर जाडसर वाटावा.
- त्याला मीठ लावून पिळून घ्यावा.
- नंतर चवीपुरते मीठ, साखर, लिंबाचा रस व दाण्याचा कूट घालून सर्व एकत्र करून बारीक करावे.
- ही चटणी सॅण्डविचेसला लावायला चांगली.
- रंगही चांगला येतो व चवीलाही चांगली लागते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.