Halaman

    Social Items

Chakli Recipe | How to make Chakli Recipe | Diwali Recipe | चकलीची भाजणी

प्रकार-१

साहित्य-

 ५०० ग्रॅम तांदूळ, २५० ग्रॅम हरभरा डाळ, १२५ ग्रॅम उडीद डाळ, १२५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार-२

साहित्य- 

६०० ग्रॅम तांदूळ, २०० ग्रॅम हरभरा डाळ, १५० ग्रॅम उडीद डाळ, ७५ ग्रॅम मुगाची डाळ, एक वाटी जिरे, एक वाटी धणे.

प्रकार -३

साहित्य -

चार वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, दोन वाटी पंढरपुरी डाळ्या, अर्धी वाटी जिरे, एक वाटी पोहे, दोन टे.स्पू. मेथी दाणे.

प्रकार-४

साहित्य- 

५०० ग्रॅम ज्वारी, २५० ग्रॅम हरभरा डाळ, २०० ग्रॅम उडीद दाळ, १०० ग्रॅम मुगाची डाळ, अर्धी वाटी जिरे, अर्धी वाटी धणे.

प्रकार-५

साहित्य- 

५०० ग्रॅम तांदूळ, १५० ग्रॅम उडीद डाळ, १५० ग्रॅम हरभरा डाळ, ५० ग्रॅम मुगाची डाळ, २०० ग्रॅम ज्वारी, ५० ग्रॅम जिरे, ५० ग्रॅम धणे.

कृती- 

      वरील सर्व प्रकारांत डाळी व तांदूळ वेगवेगळे मंद आचेवर भाजून एकत्र करून दळून आणावेत. ज्या प्रकारात ज्वारी आहे- ज्वारीला पाण्याचा हात लावून सडून घ्यावी. नंतर भाजावी. वेगळी भाजून नंतर एकत्र करून दळून आणावे. भाजणी दळून आणल्यावर चकली करतेवेळी-

Chakli Recipe  How to make Chakli Recipe  Diwali Recipe

       भाजणीत तीळ-ओवा-तिखट-मीठ गरम कडकडीत मोहन घालून नीट मिक्स करून गरम पाण्याने पीठ भिजवून अर्धा तास झाकून ठेवावे. पीठ मळून घ्यावे.

प्रकार -२

      जाड बुडाच्या पातेल्यात जेवढी भाजणी पीठ घ्यायचे आहे तेवढेच पाणी मोजून घ्यावे व गॅसवर ठेवावे. पाण्यातच तिखट-मीठ, हळद, ओवा, तीळ, मोहन घालावे. पाण्याला उकडी आली की गॅस बंद करून त्यात पीठ घालावे. नीट ढवळुन मिक्स करावे. दोन तास झाकून ठेवावे. पीठ मळन घ्यावे.

      पीठ तयार झाल्यावर चकल्या घालण्यासाठी प्लॅस्टिकच्या कागदावर सोऱ्याला चकलीची चकती लावून चकल्या पाडाव्यात. कढईत तेल तापवून मध्यम आचेवर चकल्या तळाव्या. तळून कागदावर पसरावी. गार झाल्यावर डब्यात भरावी.

कणकेच्या चकल्या

साहित्य-

२०० ग्रॅम कणीकहळद, तिखट, मीठ, तीळ, ओवा, हिंग, तळायला तेल.

कृती-

      पातळ सुती फडक्यात कणकेची सैलसर पुरचुंडी बांधून कुकरमध्ये चाळणीवर ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्यावी. कुकर गार झाल्यावर पीठ काढून परातीत मोकळं कराव. चाळून घ्यावा. तळायचे तेल सोडून सर्व साहित्य घालून पीठ 
पाण्याने मळुन घ्यावा. मोहन घालू नये.
नेहमीप्रमाणे चकल्या कराव्या.

तांदळाच्या पांढऱ्या चकल्या

साहित्य -

       चार वाट्या तांदळाचे पीठ, एक वाटी उडीद डाळीचे पीठ, एक वाटी पांढरे लोणी, मीठ ,एक वाटी ओल्या नारळाचे चव. 

कृती- 

     नारळाचे चव मिक्सरमधून थोडे पाणी टाकून बारीक करून बारीक करून घ्यावेत. सर्व साहित्य एकत्र करून कढईत तेल तापवून नेहमीप्रमाणे चकल्या करा. 

Chakli Recipe | How to make Chakli Recipe in marathi | Diwali Recipe

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.