Halaman

    Social Items

Festival लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Festival लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पालक शेव रेसीपी मराठी | कुरकुरीत पालक शेव | कुरकुरीत पालक शेव बड़े ही आसान तरीके से पालक सेव | विकतच्या नमकीनला पर्याय खमंग कुरकुरीत अशी पालक शेव | Palak shev Recipe in Marathi | Palak Sev | Quick Snack Recipe | Diwali Special Snacks Recipe | Homemade Crispy Sev Recipe | Tasty and Crispy | Spinach Sev Recipe | How to Make Palak Sev | Spinach Sev Diwali Special

मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal

हा गोड पदार्थ गुजरातमध्ये प्रसिद्ध आहे. मोठ्या सणाला 'हा पदार्थ हमखास तेथे केला जातो.

साहित्य :

  • एक किलो हरभरा डाळीचा रवा,
  • तूप अर्धा किलो,
  • साखर,
  • वेलची
  • जायफळ पूड,
  • केशरी रंग,
  • दूध.

मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal
मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal

कृती :

  • हरभऱ्याची डाळ थोडी भाजून त्याचा गिरणीतून रवा काढावा.
  • सर्व पीठ चाळून घ्यावे.
  • या पिठात थोडे तूप, दूध घालून सर्व पीठ हाताने एकसारखे कालवून घ्यावे.
  • एका मोठ्या कढईत जरा जास्त तुपावर हे पीठ गुलाबी रंगावर, खमंग वास येईपर्यंत भाजावे.
  • नंतर त्यावर दुधाचा शिपका घालावा.
  • पीठ झार्याने हलवावे म्हणजे ते फुलून येईल.
  • एका पातेल्यात तीन-चार वाट्या साखर घालून ती भिजेल एवढे पाणी घालून दोन तारी पाक करावा.
  • त्यात वेलचीपूड व जायफळपूड घालावी.
  • केशरी रंगही घालावा.
  • भाजलेला रवाही घालावा.
  • चांगले हलवावे.
  • थाळीला तूप लावून हे मिश्रण त्यात ओतावे.
  • काजू बदाम कापानी सजवावे.
  • मिश्रण गरम असतानाच वड्या पाडाव्यात.

मोहनथाळ रेसीपी मराठीत | Mohanthal Recipe in Marathi | How to make Mohan Thal