झटपट, खमंग आणि कुरकुरीत मक्याचा चिवडा रेसिपी मराठीत | दिवाळी फराळ | Makyacha Chivda Recipe in Marathi | Crispy Corn Fakes Chiwda | Makai Chivda | Diwali Recipe
(मायक्रोवेव्हमध्ये पोहे भाजूनसुध्दा हा चिवडा करता येतो.)
साहित्य-
- २ वाटी मक्याचे पोहे,
- अर्धा वाटी दाणे,
- पाव वाटी डाळवा,
- पाव वाटी बटाट्याचा किस,
- पाव वाटी सुके खोबरे पातळ चिरून,
- पाव वाटी कोथिंबीर वाळवून केलेली पूड,
- तिखट,
- मीठ,
- हळद अंदाजे,
- आमचूर पावडर अर्धा चमचा,
- थोडी साखर,
- चिवडा मसाला लहान दीड चमचा,
- तळण्यासाठी तेल अंदाजे.
कृती-
- गरम कढईत तेलावर प्रथम दाणे तळून घ्या.
- क्रमाक्रमाने बटाट्याचा किस, सुके खोबऱ्याचे तुकडे, डाळवं तळून बाजूला ठेवा.
- भरपूर तेलावर मीठ, हळद, आमचूर पावडर, कोथिंबीर पूड व वरील तळलेले साहित्य टाकून दीड चमचा चिवडा मसाला घाला.
- चवीनुसार साखर घाला.
- चांगले हलवून खायला द्या.
- आवडीनुसार ड्रायफ्रूटसुध्दा घालू शकता.
- हा चिवडा मुले आवडीने खातील व बनवतीलसुध्दा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.