Halaman

    Social Items

मूग मेथीचे धिरडे रेसिपी मराठीत / Moong Methi che Dhirade Recipe in Marathi

 मूग मेथीचे धिरडे रेसिपी मराठीत / Moong Methi che Dhirade Recipe in Marathi


साहित्य-


  • २ वाटी मूगाची डाळ,
  • २ चमचे मेथ्या,
  • ३ हिरव्या मिरचीचे तुकडे,
  • १ चमचा जिरे,
  • ३ ते ४ लसूण पाकळ्या,
  • मीठ,
  • हळद अंदाजे,
  • बारीक चिरलेली कोथिंबीर,


कृती -


  • मुगाची डाळ २ ते ३ तास पाण्यामध्ये भिजत घालावी.
  • मेथ्या रात्री भिजत घालून सकाळी कापडामध्ये बांधून ठेवावी.
  • छान मोड येतात.
  • मोड आलेल्या मेध्या व भिजलेली डाळ, लसूण, जिरं व हिरवी मिरची घालून बारीक वाटून घ्यावी.
  • मीठ व हळद, बारीक चिरून कोथिंबीर घालावी.
  • डावाने कालवून थोडे आवश्यकतेनुसार पातळ करावे.
  • तव्यावर तेल पसरवून धिरडे घालावे.
  • लालसर रंगावर शेकून सॉससोबत खायला द्यावे.
  • रुचकर व पौष्टिक पदार्थ नास्त्यासाठी उत्तम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.