मेथीचा भरडा रेसिपी मराठीत / मेथी बेसन / मेथीची भरडा भाजी / Besan Methi Recipe in Marathi / Methi Chi Bhaji / Methi cha Bharada
साहित्य-
- दीड वाटी चणा डाळीचा भरडा,
- दीड चमचा मेथ्या,
- लसूण वाटलेला १ चमचा,
- तेल.
- जिरे
- मोहरी,
- कढीपत्ता
- हिंग
- वाळलेली लाल मिरची.
- बारीक चिरलेली कोथिंबीर,
- चवीनुसार तिखट,
- मीठ,
- हळद,
कृती-
- चणा डाळ खमंग भाजून, भरडा करून घ्या.
- कढईत तेलावर मोहरी, जिरं घाला.
- दीड लहान चमचा मेथ्या घाला व परता.
- हिंग, कढीपत्ता लाल मिरचीचे तुकडे घाला.
- लसणाची पेस्ट घाला व अंदाजे पाणी (पाणी थोडे घाला)
- पाण्यामध्ये हळद, तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- पाणी उकळल्यावर मावल तसा भरडा घाला,
- चांगले हलवून वाफ येऊ द्या.
- बाळंतणीसाठी चणा डाळीऐवजी मुगाचा भरडा वापरा.
- वेगळं तोंडी लावण चवदार वाटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.