Halaman

    Social Items

मूगवडी दही चाट रेसिपी मराठीत । Moong Vadi Dahi Chaat Recipe in Marathi | चिंचेची चटणी रेसिपी मराठीत | Imli Chi Chatni Recipe in Marathi | Chinchechi Chatani | Tamarind Chutney

मूगवडी दही चाट रेसिपी मराठीत । Moong Vadi Dahi Chaat Recipe in Marathi



 हा मे महिना म्हटलं की नुसता उन्हाचा दाह, दिवसही मोठा असतो. सुट्यांमुळे मुलेही घरीच असतात, तेव्हा ४ वाजले की खाण्याचे वेध लागतात. त्यातल्या त्यात मुलांना खमंग, चटकदार खायला हव असत, त्यांना बनवायलाही आवडतं. तेव्हा पाहू यात काही खाऊचे प्रकार जे मुलेही स्वत: बनवून खाऊ शकतील.



  • यासाठी मुगाची डाळ भिजवून मुगवडी तयार करून घ्या. (लहान आकारात),
  • ताकामध्ये सोडून थोडा वेळ ठेवा.
  • निथळून गोड दह्यामध्ये घालून ठेवा.
  • यासाठी हिरवी चटणी, खालीलप्रमाणे बनवून घ्या.


साहित्य -


  • १ वाटी कोथिंबीर,
  • ३ ते ४ मिरच्या,
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या,
  • पुदिना पाव वाटी



  • सर्व मिसळून थोडे पाणी घालून वाटून घ्या.
  • वरून मीठ व लिंबू पिळा आवडीनुसार साखर घाला. 






चिंचेची चटणी रेसिपी मराठीत | Imli Chi Chatni Recipe in Marathi | Chinchechi Chatani | Tamarind Chutney



  • रात्रभर चिंच भिजवून सकाळी चांगली कोळून गर काढा,
  • चाळणीतून गाळून घ्या.
  • ३ पट साखर, अंदाजे मीठ व
  • मिरेपूड घालून घट्टसर शिजवून घ्या,
  • आंबट गोड चटणी चाटसाठी वापरता येईल.



साहित्य-


  • २ वाटी मूग भिजवून,
  • वाटून थोडा लसूण,
  • तिखट मीठ घालून लहान लहान आकारातील मुगवड्या बनवून घ्या.
  • बारीक चिरलेला कांदा २ वाट्या,
  • बारीक चिरलेली कोंथिबीर १ वाटी,
  • बारीक शेव २ वाटी,
  • नारळाचा किस १ वाटी,
  • हिरवी चटणी २ चमचे,
  • चिंचेची चटणी २ चमचे,
  • चाट मसाला एक ते दीड चमचा..


कृती-


  • प्लेटमध्ये दह्यात भिजवलेल्या मुगवड्या घाला.
  • त्यावर थोडं दही, बारीक चिरलेला कांदा, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, बारीक शेव भरपूर घाला.
  • नारळाचा किस घाला,
  • वरून कोथिंबीर घाला.
  • चाट मसाला, थोडे तिखट, मीठ भुरकवून खायला द्या.
  • (खमंग चटपटीत चाट मुलांना खूप आवडेल.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.