शेवग्याचे सांडगे रेसीपी मराठी|वेगळ्या चवीचे वर्षभर टिकणारे शेवग्याच्या शेंगांचे सांडगे / वडे / वड्या | Shevgyachya Shengache sandge Recipe in Marathi | vadya recipe | vade | Maharashtra Recipe
साहित्य-
- १ किलो चांगल्या मगसदार
- शेवग्याच्या शेंगा,
- २ वाट्या मूग डाळ,
- १ वाटी मटकी डाळ,
- २ वाट्या चण्याची डाळ,
- अर्धी वाटी हिरवी मिरची,
- लसूण पेस्ट,
- बारीक चिरलेली कोथिंबीर,
- चवीला मीठ.
कृती-
- प्रथम सर्व डाळी वेगवेगळ्या चार-पाच तास भिजत ठेवाव्यात.
- शेंगा धुवून त्याचे तुकडे कमी पाण्यात शिजवावेत.
- या नंतर सर्व डाळीतील पाणी काढा.
- शेंगा थंड झाल्यावर त्याचा गर काढून सर्व डाळीत मिसळा.
- त्यात लसूण, मिरच्या, कोथिंबीर व मीठ टाकून मिक्सरमधून काढा व
- एका प्लास्टिक पेपरवर सांडगे टाकून कडक उन्हात वाळवा.
- वर्षभर चांगले राहतात
- व वेळेवर तळा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.