ज्वारीचे आंबील रेसीपी मराठी | ज्वारीचे आंबील महालक्ष्मी प्रसाद |मराठवाड्यात वेळ अमावस्येला पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ज्वारीच्या पिठाची आंबील | Jwariche Ambil Marathi Recipe
Jowar Ambil mahalaxmi prasad marathi Recipe
साहित्य -
- एक वाटी ज्वारीचे पीठ,
- एक वाटी आंबटसर दही,
- अर्धा वाटी पाणी,
- मीठ.
कृती-
- रात्रीला ज्वारीचे पीठ, दही, पाणी एकत्र भिजवून ठेवा.
- सकाळी एक ते दीड ग्लास पाणी एका गंजात गरम करायला ठेवा,
- पाणी चांगले उकळी आले की, त्यात चवीप्रमाणे मीठ घाला
- व ज्वारीच्या पीठाचे मिश्रण त्या पाण्यात टाकत चला आणि
- ढवळत चला.
- साधारणत: आपल्याला आवडेल त्याप्रमाणे पातळ केली तरी चालेल.
- चांगली उकळी येईपर्यंत शिजू दया.
- झाली आंबील तयार.
- ही ज्वारीची आंबील अतिशय गुणकारी आहे.
- उन्हाळ्यात बाहेर निघताना ही आंबील घेऊन निघाल्यास ऊन लागत नाही.
- मात्र आंबील खायला देताना, त्यासोबत बारीच चण्याची उसळ आणि कांदा दयायला विसरू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.