Halaman

    Social Items

घरगुती खमंग ढोकळा रेसीपी मराठीत | झटपट ढोकळा | मार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी | Khaman Dhokla Recipe in Marathi | Instant Dhokla Recipe

घरगुती खमंग ढोकळा रेसीपी मराठीत |
झटपट ढोकळा | मार्केटसारखा खमण ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसीपी | Khaman Dhokla Recipe in Marathi | Instant Dhokla Recipe




साहित्य - 


  • एक वाटी तांदुळ, 
  • अर्धा वाटी चणा दाळ, 
  • पाव वाटी उडीद दाळ, 
  • ४ हिरव्या मिरच्या, 
  • ५ लसुण कळ्या, 
  • थोडे अद्रक, 
  • कोथिंबीर, 
  • जिरे, 
  • अर्धा वाटी दही, 
  • पाव चमचा खाण्याचा सोडा, 
  • हळद, 
  • मीठ, 
  • साखर. 




कृती-


  • रात्री तांदूळ, चणा दाळ, उडीद दाळ वेगवेगळे भिजत घाला. 
  • सकाळी मिक्सरमधून प्रथम तांदूळ नंतर दोन्ही दाळी बारीक करून घ्या व एकत्र करा. 
  • या मिश्रणात दही मिक्स करून मिश्रण तसेच राहू दया. 
  • संध्याकाळी ढोकळा करताना त्यात मिरची, अद्रक, लसूण, जिऱ्याची पेस्ट करून मिश्रणात मिक्स करून फेटा. 
  • नंतर त्यात आवश्यक तेवढी हळद, मीठ, चवीपुरती साखर
  • घाला व 
  • चांगले एकत्र करा. 
  • मिश्रण कूकरमध्ये ठेवताना मिश्रणात पळीभर चमच्यात गरम तेल करून, त्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला 
  • व मिश्रणात घाला. 
  • मिश्रण थोडे गरम पाणी घालून मध्यम पातळ करून घ्या व 
  • चांगले फेटून घ्या. 
  • ढोकळा करताना कूकरच्या डब्याला तेल लावून, मिश्रण अर्धा डबा भरेल एवढेच भरा. 
  • कूकरमध्ये थोडे पाणी घालून, मिश्रण ठेवलेला कूकरचा डबा कूकरमध्ये ठेवा. 
  • कूकरची शिट्टी काढून कूकर गॅसवर २० ते २५ मिनिटे ठेवा 
  • व नंतर ५ मिनिट मंद आचेवर होऊ दया. नंतर गॅस "बंद करा. 
  • कूकर अगदी थंड होऊ दया. 
  • नंतर चाकूने त्याचे मिडीयम चौकोनी आकाराचे काप करा. 
  • वरून हिंग मोहरीची फोडणी घाला. 
  • बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 
  • चटणीसोबत सर्व्ह करा. 
  • असा ढोकळा सर्वांना आवडेल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.