Halaman

    Social Items

10 Papad Recipe in Marathi | पापड उन्हाळी कामे 

  1. तांदळाचे पापड
  2. उडदाचे पापड
  3. चटपटे पापड
  4. चुरमुऱ्यांचे पापड
  5. पोह्याचे पापड
  6. ज्वारीचे लोंध्याचे पापड
  7.  नाचणीचे पापड
  8. वाफेवरले पापड
  9. फणसाचे पापड
  10. ज्वारीचे बिबडे (पापड)

१. तांदळाचे पापड

साहित्य -

  • १ किलो तांदूळ,
  • लाल तिखट,
  • पापडखार,
  • हिंग,
  •  मीठ.

कृती -

  • तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून ते दळून आणावे, 
  • १ भांडे पिठाला १ भांडे पाणी देऊन त्यात अर्धा चमचा हिंग पावडर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार व १ चमचा लाल तिखट पाण्यात घालावे. 
  • पाण्याला उकळी आल्यावर त्यात १ भांडे तांदळाचे पीठ घालून मंद विस्तवावर पिठाची उकड करावी, 
  • उकडीला दोन वाफा आल्यावर ढवळून गॅस बंद करावा. 
  • गरम असतांनाच पीठ तेलाच्या हाताने मळून घ्यावे व 
  • तेलाच्या हाताने एकसारख्या लाटया तयार करून तेलावरच पापड लाटावेत.

टीप - 
             ह्या पापडाचे पीठ एक वेळेला १ भांडयाचेच करावे, नाहीतर पीठाचा चिकटपणा गार झाल्यावर कमी होऊन पापड लाटतांना फाटतात.

२. उडदाचे पापड

10 Papad Recipe in Marathi  पापड उन्हाळी कामे

  • २ किलो उडदाच्या डाळीचे पीठ,
  •  १०० ग्रॅम पापडखार,
  • १।। बारीक मीठ,
  • १५ ग्रॅम पांढरे मिरे,
  •  २५ ग्रॅम काळे मिरे,
  •  हिरव्या मिरच्या आवडीनुसार,
  •  १।। वाटी तेल,
  •  ५० ग्रॅम हिंग.

कृती -

  • उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, ४ वाटया पाणी पातेल्यात घ्यावे.
  • त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. 
  • पाणी गार झाल्यावर थोडा पापडखार खाली बसेल तो घेऊ नये वरील पाणी घ्यावे. 
  • हिरव्या मिरच्यांवर उकळते पाणी घालून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे तिखट तयार करावे. 
  • मिर्यांचची व हिंगाची पूड करावी.
  • उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंगपूड, तिखट घालून पापडखार व मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे.
  • पीठ शक्यतो रात्री भिजवून ठेवावे. 
  • दुसर्‍या दिवशी पाटयाला व वरवंटयाला तेलाचा हात लावून कुटावे. 
  • पीठ कुटून त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. 
  • पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब करून परत गोळा करून कुटावा.
  • पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या हाताने सारख्या आकाराच्या लाटया करून झाकून ठेवाव्यात 
  • व एक एक लाटी उडदाच्या डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. 
  • तयार झालेले पापड सावलीत वाळवून डब्यात भरावेत. 
  • सर्व पापड झाल्यावर दोन दिवस सावलीत खडखडीत वाळवावेत.

टीप - 

वरील पापडाच्या पिठात १ किलो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद-मुगाचे पापडही चांगले होतात. पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटूनयेत. भाजतांना लवकर जळतो.

३.  चटपटे पापड

साहित्य - 

  • एक जुडी आंबट चुका,
  •  एक वाटी पातळ पोहे,
  •  एक इंच आले,
  •  एक चमचा जिरेपूड,
  •  एक चमचा धणेपूड,
  • चार हिरव्या मिरच्या,
  • मीठ,
  • तांदळाचे पीठ.

कृती - 

  • पोहे कोरडेच भाजा. गार झाल्यावर त्याची पावडर करा. 
  • चुका, मिरची, आलं मिक्सरमधून काढा. 
  • त्यात धनेपूड, जिरेपूड, मीठ, पातळ पोह्य़ाची पावडर घाला. 
  • आवश्यक तेवढे तांदळाचे पीठ घालून मळा व लाटून उन्हात सुकवावेत. 
  • तळल्यावर वरून चाट मसाला घाला.

 ४. चुरमुऱ्यांचे पापड

साहित्य -

  • कुरमुरे,
  • बेताची हिरवी मिरची,
  • कोथिंबीर,
  • धणे,
  • जिरेपूड,
  • चवीनुसार मीठ,
  • लसूण
  • आले. 

कृती -

  • तीन तास कुरमुरे पाण्यात भिजत घालावे. 
  • त्यानंतर ते गाळून त्यात हिरवी मिरची, लसूण-आलं यांची पेस्ट घालावी. 
  • बेताची धणे-जिरे पूड, चवीनुसार मीठ घालून कुरमुरे कणकेप्रमाणे मळावे. 
  • चांगला गोळा करून घ्यावा. 
  • नंतर लहान लिंबाएवढे गोळे करून प्लास्टिकवर गोळा ठेवून लाटा व उन्हात वाळवा.

 ५. पोह्याचे पापड

साहित्य -

  • १ किलो जाड पोहे थोडे भाजून दळून घ्यावेत.
  •  पोह्याचे निम्मे पीठ पापड लाटायला ठेवावे,
  • लाल तिखट,
  • पापडखार,
  • हिंग,
  •  दळलेले मीठ.

कृती - 

  • १ भांडे पिठाला १ भांडे पाणी, अर्धा चमचा हिंग पावडर, १।। चमचा मीठ, २ चमचे लाल तिखट व १।। चमचा पापडखार घालून पाणी उकळावे. 
  • पाणी खाली उतरवून कोमट झाल्यावर त्यात एक भांडे पोह्याचे पीठ घालावे व पीठ भिजवून तेलाचा हात लावत पिठाचा गोळा खलबत्यात घालून कुटावे. 
  • पिठाचा कुटून लुसलुशीत गोळा तयार झाला पाहिजे. जेवढे पीठ जास्त कुटू तेवढे पापड हलके होतात. 
  • पीठ कुटून झाल्यावर तेलाच्या हाताने त्याच्या लाटया कराव्यात व पोह्याच्या पीठावर पापड लाटावेत
  •  व सावलीत वाळवावेत. 
  • नंतर दोन दिवस उन्हात खडबडीत वाळवून डब्यात भरावेत.

टीप -

            पोह्यांचे पीठ थोडे थोडे भिजवून कुटून मगच पापड लाटावे लागतात. एका वेळी एकाच भांडयाचे पीठ भिजवावे. सगळे पाणी व सगळे पीठ कधीच एकदम मिसळून तयार करू नये. कारण त्यामुळे काही वेळ गेल्यावर त्याचा चिकटपणा कमी होतो.

६. ज्वारीचे लोंध्याचे पापड

साहित्य: 

ज्वारी आणि  मीठ. 

कृती: 

  • ज्वारी पाण्याचा हात लावून कांडून-पाखडून घ्यायची.
  • तीन दिवस भिजवून वाळवून दळून आणायची.  
  • उकळत्या पाण्यात पीठ आणि मीठ घालून ते चांगलं घोटून घ्यायचं. 
  • आणि वाफ काढून त्याचे पापड लाटायचे. 
  • हे पापड बिबडय़ांसोबत खाण्यासाठी म्हणून बनवले जातात.
  • पांढराशुभ्र ज्वारीचा पापड आणि पिवळसर चटकदार बिबडे हे कॉम्बिनेशन म्हणजे खान्देशची खासियत आहे.

 ७. नाचणीचे पापड 

साहित्य - 

  • ५०० ग्रॅम नाचणीचे पीठ,
  • १० ग्रॅम मीठ,
  • १५ ग्रॅम पापडखार,
  • ५ ग्रॅम मिरची,
  • ३ ग्रॅम तीळ,
  • २ ग्रॅम जिरे.

कृती - 

  • नाचणी रात्री धुऊन त्याची पुरचंडी बांधून ठेवावी,
  • दुसऱ्या दिवशी पुरचुंडी सोडून नाचणी चांगली सावतील सुकल्यावर दळावी. 
  • नंतर ते पीठ वस्त्रगाळ करून घ्यावे. 
  • जेवढे पेले पीठे असेल तेवढे पेले पण गॅसवर उकळत ठेवावे.
  • पाण्यामध्ये वरील सर्व मसाला घालावा. 
  • पाण्याला उकळी आल्यावर नाचणीचे पीठ त्यात थोडे थोडे टाकावे 
  • आणि पिठाची उकड करावी. 
  • तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्यावे.
  • त्यानंतर प्लॅस्टिक कागद खालीवर घालून पोळपाटावर छोटे छोटे पापड लाटावे 
  • आणि नंतर सावलीत वाळवावेत.
  • पापड ऐवजी लाटीला चिरल्यास नाचणी चिप्स तयार होतील. 

 ८. वाफेवरले पापड

साहित्य:

  • तांदूळ,
  • ज्वारी,
  • गहू,
  • नाचणी,
  • नागली,
  • साबुदाणा,
  • मीठ,
  • ओवा,
  • तीळ आणि
  • जिरे

कृती: 

  • साबुदाणा वगळता प्रत्येक धान्य दळून आणायचं.
  • दळतानाच त्यात ओवा, जिरे घालून दळायचं. 
  • रात्री पीठ भिजवताना त्यात तीळ आणि मीठ घालायचे. 
  • सकाळी मोठय़ा पातेल्यात पाणी घालून त्यावर चाळणी ठेवायची. 
  • ढोकळा लावतो त्याप्रमाणो लहान लहान ताटलीला तेल लावून त्यात थोडं पीठ घालून पातळ पसरायचं.
  • त्या चाळणीवर ठेवून त्यावर झाकण ठेवायचं. 
  •  १० ते १५ मिनिटं वाफ घेऊन ताटली खाली काढून कडेला सुईनं कडा उकलून पापड काढून सुपावर घालून जरा हडकले की, उन्हात वाळवून ठेवायचे. 
  • हा पापड तळला की खूप फुलतो. तोंडात टाकला की पाणी अशी या पापडांची ख्याती आहे.

९.  फणसाचे पापड

साहित्य -

  • २०/२५ पिकलेल्या बरक्या फणसाचे गरे,
  • ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ,
  • दोन टी स्पून जिरे,
  • अर्धा टी स्पून मिरपूड,
  • मीठ,
  • हिंग

कृती - 

  • बरक्या फणसाचे गरे आठळ्या काढून मिक्सरमधूान काढावे. 
  • गराच्या दुप्पट पाणी घालून चांगले शिजवावे. 
  • त्यात जिरे, हिंग, मीठ घालावे. 
  • गर मोजून त्यात तेवढेत तांदळाचे पीठ घालावे व पापड लाटून, वाफवून (उकड देऊन) वाळवावे

१०. ज्वारीचे बिबडे (पापड)

साहित्य- 

  • एक किलो ज्वारी,
  • २०/२५ लसणाच्या पाकळ्या,
  •  चार चमचे जिरे,
  • चार चमचे तीळ,
  • मीठ मोठय़ा प्रमाणात,
  • तिखट पाऊण चमचा.

कृती- 

  • ज्वारी तीन दिवस भिजवा. 
  • तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चांगली धुवा व मिक्सरवर दळा. 
  • सकाळी लसूण व जिरे वाटा. 
  • जेवढे वाटलेली ज्वारी असेल त्याच्या दुप्पट पाणी गरम करत ठेवा.
  • पाणी उकळल्यावर त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घाला. 
  • नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडा, पीठ इडली पिठासारखे असावे. 
  • ते हलवत राहा. पिठास फुगे फुगे आल्यासारखे वाटले की पीठ शिजले असे समजा. 
  • मग पोळपाटावर ओला रुमाल करून त्यावर पळीभर पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापा
  •  व उन्हात एका कपडय़ावर तो रुमाल उचलून त्यावर तो पापड हळूच ठेवा. 
  • हे न जमल्यास पळीने कपडय़ावर ठेवावे. वाळल्यावर उलटे करून पापड काढा व परत वाळवा. तळून- भाजून खावे.

10 Papad Recipe in Marathi | How to make Papad | पापड उन्हाळी कामे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.