कॉर्नफ्लेक्स चिवडा नमकीन | Cornflakes Chivda Namkeen in Marathi
साहित्य -
- कॉर्नफ्लेक्स ५ वाटी,
- शेंगदाणे १/२ वाटी,
- डाळ्या १ वाटी,
- सुके खोबरे काप १/२ वाटी,
- काजू २ चमचे,
- खसखस १ चमचा,
- तीळ १ चमचा,
- ओवा,
- धने,
- जिरे,
- बडीशोप प्रत्येकी १ चमचा पूड,
- चिरलेली हिरवी मिर्ची ४ चमचे,
- चिरलेला कढीपत्ता २ चमचे,
- आमचूर ३ चमचे,
- तिखट,
- मिठ चवीनुसार,
- हळद,
- पिठी साखर २ चमचे,
- तेल २ डाव,
कॉर्नफ्लेक्स चिवडा Cornflakes Chivda Namkeen |
कृती-
- शेंगदाणे, डाळ्या, खोबरे काप, काजू गरम तेलात तळून घ्या.
- गॅसवर कढईत तेलात फोडणी तडतडल्यावर त्यात हिरवी मिर्ची, कढीपत्ता घाला.
- नंतर खसखस, तीळ, तिखट, मीठ, हळद घालून गॅस बंद करा.
- मोठ्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लेक्स काढा.
- त्यात वरील साहित्य व पिठी साखर, सर्व पावडर घालून मिक्स करा.
- झाला झटपट खमंग चिवडा तयार.
टीप-
कॉर्नफ्लेक्स भाजू किंवा तळू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.