सोया फुटाणे खजूर मिक्स लाडू । Soya Futane khajur Mix ladu in Marathi | How to make Soya Futane Dates Mix Laddu
साहित्य -
- सोया फुटाणे २ वाटी,
- मका पोहे १ वाटी,
- मुरमुरे १ वाटी,
- शेगदाणे (भाजलेले) १/२ वाटी,
- भाजलेला खोबरा किस १/२ वाटी.
- बिया काढलेला खजुर २ वाटी,
- किसलेला गूळ १ वाटी.
- साजूक तूप ४ चमचे.
- भाजलेली चारोळी ४ चमचे,
- विलायची पूड १/२ चमचा,
- तळणासाठी तूप.
सोया फुटाणे खजूर मिक्स लाडू । Soya Futane khajur Mix ladu How to make Soya Futane Dates Mix Laddu |
कृती -
- गॅसवर पॅनमध्ये मुरमुरे थोडे गरम करा.
- नंतर सोया फुटाणे गरम करा.
- (कोरडे) त्याच पॅनमध्ये तुपात मका पोहे तळा.
- तळलेले पोहे थंड होईपर्यंत सोया फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे मिक्सरमधून वेगवेगळे बारीक करा.
- हे सर्व साहित्य परातीत ठेवा.
- मका पोहे हातानेच कुस्करा.
- खजूर मिक्सितून वाटा.
- खोबरा किस, चारोळी, गुळ, तूप, वेलदोडा पूड व पोह्यांचा कुस्करा परातीत घालून चांगलं मळून छोटे छोटे लाडू बनवा.
- अतिशय पौष्टिक खिरापत तयार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.