गुळ पोहे वडी । Gul Pohe Vadi in Marathi | How to make Jaggery Poha Vadi
साहित्य -
- जाड पोहे २ वाटी,
- चिकिचा बारीक केलेला गुळ १ वाटी,
- डाळ्या पूड १/२ वाटी,
- सुके खोबरे किस पाव वाटी,
- अर्धा चमचा वेलदोडा पूड,
- तळणासाठी तूप.
गुळ पोहे वडी । Gul Pohe Vadi How to make Jaggery Poha Vadi |
कृती -
- गॅसवर कढईत तूप गरम झाल्यावर कढईत तळणी ठेवून पोहे तळून घ्या.
- तळलेले पोहे पेपरवर पसरवा.
- खोबरे किस व डाळ्या पूड कोरडेच किंचित भाजा.
- पोहे कोरडे झाल्यावर मिक्सितून बारीक करा.
- मोठ्या बाऊलमध्ये पोह्यांची पूड, खोबरे किस, वेलदोडे पूड, डाळीची पूड, चिकीचा गुळ चांगलं मळून एकत्र कालवा.
- तिळगुळाच्या वड्या पाडण्याचा लाकडी सांचा असतो.
- त्यात हे मिश्रण घालून योग्य त्या आकाराच्या वड्या पाडा.
टीप -
वड्यांचे लाकडी सांचे निरनिराळ्या आकारांचे मिळतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Please do not enter any spam link in the comment box.