Chutney लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Chutney लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कैरी आंबट गोड चटणी । Mango Sour Sweet Chutney in Marathi। Kairi Chutney Recipe
साहित्य:-
- अर्धा किलो कैऱ्या,
- जेवढे गोड आवडेल तेवढा अंदाजे गुळ,
- पाव वाटी तेल,
- एक चमचा तिखट,
- फोडणीसाठी मोहरी,
- जिरे
- हिंग
- हळद,
- चवीपुरते मीठ.
कृती:-
- कुकरमध्ये खाली पाणी घालून एका पसरट भांड्यात कैऱ्या ठेवा
- व त्यात वाफ तयार होईल इतकेच पाणी घाला.
- दोन शिट्या होऊ द्या.
- कैऱ्या थंड झाल्यावर सोलून त्याचा गर काढा.
- त्यात गुळ मिसळा,
- हलवून ठेवा म्हणजे गुळ विरघळेल.
- आता एका जाड बुडाच्या कढईत किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये ते कडक होणार नाही इतपतच शिजवा.
- त्यातच तिखट व मीठ घाला.
- खाली उतरवून त्यावर जरा जास्त तेलात मोहरी, जिरे, हळद, हिंगाची फोडणी घाला.
- ही चटणी ब्रेडबरोबर छान लागते.
कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा | Kairi Chutney / Murabba Recipe in Marathi | How to make Mango Chutney
साहित्य:-
- एक किलो कैऱ्या,
- साखर,
- दोन चमचे तिखट,
- पाच-सात लवंगा,
- दालचिनीचा तुकडा,
- १०-१२ काळे मिरे,
- एक चमचा जिरे
- चवीपुरते मीठ.
कैरी चटणी / छुुंदा / मुरब्बा | Kairi Chutney / Murabba Recipe | How to make Mango Chutney |
कृती:-
- कैऱ्या धुवून, पुसून त्यांची साले काढावीत
- व किसून घ्याव्यात.
- जेवढा किस असेल तेवढीच साखर घेऊन, दोन्ही एकत्र करून जाड बुडाच्या कढईत मंदाग्नीवर शिजत ठेवावे.
- मधून-मधून हलवत राहावे.
- साखरेचा पाक होऊन त्यात कैरीचा किस व्यवस्थित शिजल्यावर त्यात तिखट, मीठ व वर सांगितलेला गरम मसाला दरदरीत (जाडसर) दळून त्यात घालावा.
- आवडत असल्यास छोटी विलायचीचे दाणेही घालावेत.
- पाच-सात मिनिटे शिजवून पूर्ण थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.
टीप:-
हाच छुुंदा जर साखर आणि कैरीचा किस एका काचेच्या मोठ्या तोंडाच्या बाटलीत भरून वर पातळ फडक्याने त्या बाटलीचे तोंड बांधून उन्हात इतक्या दिवस ठेवला की साखरेचा पाक होऊन पुन: तो घट्ट होईल व नंतर त्यात वरील मसाले घातले तर त्याची चव काही वेगळीच लागते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)