Halaman

    Social Items

Drinks or Juice लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Drinks or Juice लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आरोग्यवर्धिनी सरबत | Healthy Sharbat Recipe in Marathi | How to make Healthy Sharbat



साहित्य


  • एक टोमॅटो
  • एक गाजरे
  • एक संत्रे
  • अर्धा चमचा खसखस
  • वेलची २
  • जायफळ छोटा तुकडा
  • सायट्रिक एसिड पाव चमचा
  • ४/५ मिरे
  • मीठ चवीनुसार
  • पादेलोण
  • दालचिनीचा तुकडा
  • २ थेंब लिंबाचा रस
  • दोन चमचे साखर
  • बर्फाचा चुरा
  • मसालापूड

आरोग्यवर्धिनी सरबत  Healthy Sharbat Recipe  How to make Healthy Sharbat
आरोग्यवर्धिनी सरबत  Healthy Sharbat Recipe  How to make Healthy Sharbat


कृती


  • प्रत्येकी एक टोमॅटो, गाजरे व संत्रे यांचा रस काढा.
  • अर्धा चमचा खसखस भाजून, वेलची २, जायफळ छोटा तुकडा, सायट्रिक एसिड पाव चमचा, ४/५ मिरे, मीठ, पादेलोण, दालचिनीचा तुकडा एकत्र कुटून पावडर करा.
  • तिन्ही ज्यूस एकत्र करा.
  • त्यात २ थेंब लिंबाचा रस, दोन चमचे साखरेचा पाक घाला.
  • सगळ एकत्र करा.
  • हलवा,
  • बर्फाचा चुरा घाला.
  • मिक्सरवर फिरवा.
  • ग्लासमध्ये घाला.
  • वर मसालापूड भुरभुरा.
  • हलवून घ्या.

आरोग्यवर्धिनी सरबत | Healthy Sharbat Recipe in Marathi | How to make Healthy Sharbat

आवळा सरबत । Amala Sharbat Recipein Marathi | How to make Amala Sharbat



साहित्य-


  • अर्धा किलो आवळे,
  • २५ ग्रॅम आले,
  • ३०० ग्रॅम साखर.


आवळा सरबत । Amala Sharbat Recipe  How to make Amala Sharbat
आवळा सरबत । Amala Sharbat Recipe  How to make Amala Sharbat


कृती-


  • प्रथम आले स्वच्छ धुवून किसून बारीक करा.
  • थोडे पाणी घालून रस काढून घ्या.
  • आवळे किसून वाटून त्याचाही रस काढून घ्या,
  • गाळून घ्या.
  • साखरेच्या निम्मे पाणी घालून पक्का पाक करा.
  • त्यात प्रथम आवळ्याचा व मग आल्याचा रस घाला,
  • हे हलवून मंद गॅसवर दोन चांगले चटके देऊन खाली उतरवा.
  • थंड झाल्यावर घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरून ठेवा.
  • देताना ग्लासमध्ये थोडे हे मिश्रण आवश्यकतेप्रमाणे थंडपाणी
  • व थोडा पुदिन्याचा रस व मीठ घालून घ्या.


आवळा सरबत । Amala Sharbat Recipe in Marathi | How to make Amala Sharbat

थंडाई शरबत ।Thandai Sharbat in Marathi | How to make Thandai Recipe



साहित्य-

  • ४ कप दूध,
  • आठ मिरे,
  • एक टेबल स्पून खसखस,
  • चमचाभर बडीशेप, चार मगज
  • अर्धा चमचा वेलची पूड,
  • १० बदाम बी,
  • चमचाभर रोझ इसेन्स
  • चवीप्रमाणे साखर,
  • गुलाब पाकळ्या सजावटीसाठी

थंडाई शरबत ।Thandai Sharbat  How to make Thandai Recipe
थंडाई शरबत ।Thandai Sharbat  How to make Thandai Recipe


कृती-

  • खसखस, बदाम व चार मगज पाण्यात भिजत घालावेत,
  • तीन चार तासांनी ते काढून या भिजलेल्या बदाम खसखस चार मगजमध्ये मिरी, बडीशेप घालून ते बारीक वाटावे,
  • चार कप दुधात चार कप पाणी व साखर घालून ते ढवळावे
  • व उकळायला ठेवावे.
  • तयार वाटणात थोडे थंड दूध घालून ते सरसरीत करावे.
  • गॅस मंद करून हे मिश्रण उकळत्या दुधात हलवत हळूहळू घालावे.
  • ५/७ मिनिटे उकळल्यानंतर त्यात रोझ इसेन्स घालून खाली उतरावे.
  • थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे.
  • पिण्यास देताना ग्लासमध्ये थंडाई घालून वरून गुलाब पाकळ्या भुरभुराव्यात.


टीप-

अंगातील उष्णता कमी करणारी, थकवा भरून काढणारी म्हणून ही थंडाई पंजाबात उन्हाळ्यात पिण्याची पद्धत आहे. चार मगझ, लाल भोपळा, कलिंगड, खरबूज व काकडीच्या बिया एकत्र असतात. बाजारात याचे तयार पाकीट मिळते. घरीही आपण या बिया वाळवून ठेवू शकतो.

थंडाई शरबत ।Thandai Sharbat in Marathi | How to make Thandai Recipe

पुदिना सरबत । Pudina Sharbat Recipe in Marathi | How to make pudina sharbat



साहित्य-

  • पुदिन्याची पान एक भांडंभर,
  • आल्याचा तुकडा
  • चमचाभर लिंबाचा रस,
  • सेंदेलोण,
  • पादेलोण
  • साखर

पुदिना सरबत । Pudina Sharbat | How to make pudina sharbat
पुदिना सरबत । Pudina Sharbat | How to make pudina sharbat

कृती-

  • पुदिन्याची पाने बारीक वाटा.
  • पाणी घालुन गाळून घ्या,
  • आले किसून वाटून रस काढा.
  • तो त्यात घाला
  • सेंदेलोण, पादेलोण व लिंबाचा रस घालून हलवा
  • आवश्यक तेवढे थंड पाणी घाला.
  • पुदिन्याचे सरबत तयार

पुदिना सरबत । Pudina Sharbat Recipe in Marathi | How to make pudina sharbat

जिरापाणी । Jirapani Recipe in Marathi | How to make Jirapani


जिरापाणी (प्रकार १)


साहित्य-

  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ,
  • एक इंच आले,
  • चमचाभर जिरेपूड,
  • चिमूट मिरेपुड,
  • चिमूट लाल तिखट,
  • एक टी स्पून लिंबाचा रस,
  • २ चमचे साखर,
  • चिमुट गरम मसाला,
  • चवीप्रमाणे सेंदेलोण,
  • पुदिन्याची ८/१० पाने
  • बर्फाचा चुरा.

जिरापाणी । Jirapani Recipe  How to make Jirapani
जिरापाणी । Jirapani Recipe  How to make Jirapani 


कृती-

  • चिंचेचा कोळ गाळून घ्या,
  • त्यात साखर घाला,
  • आल्याचा कीस व पुदिन्याची पाने मिक्सरवर बारीक वाटा,
  • थोडे पाणी घालून रस गाळा.
  • तो कोळात घाला.
  • मग इतर सर्व पदार्थ घालून हलवा.
  • ग्लासमध्ये खाली बर्फाचा चुरा घाला.
  • त्यावर मिश्रण घाला,
  • हलवून घ्या.


टीप-

पंजाबमध्ये ते जिरापाणी जेवणापर्वी घेण्याची पद्धत आहे. यात आले, जिरे, पुदिना, सेंदेलोण हे पाचक पदार्थ असल्याने जेवण पचायला मदत होते.


जिरापाणी (प्रकार २)


साहित्य-

  • पाव किलो चिंचेचा गाळलेला कोळ,
  • प्रत्येकी चमचाभर बडीशेप,
  • जिरे,
  • मोहरी,
  • दही,
  • काळे मिरे,
  • तीन सुक्या लाल मिरच्या,
  • दोन टेबलस्पून अनार दाणा,
  • चाट मसाला
  • वेलची.



कृती-

  • मसाल्याचे सर्व पदार्थ बारीक करून घ्यावेत.
  • कोळात पाणी घालून तो एक लिटर करावा.
  • त्यात मसालापूड घालावी व हलवावे.
  • नंतर हे पाणी माठात ५/६ तास ओतून ठेवावे.
  • प्यायला देताना थोडा बर्फ व पुदीन्याची जाडसर वाटलेली पाने घालून घ्यावे.
  • हे पेय चवदार असुन थंड गुणधर्माचे आहे.
  • त्यामुळे उन्हाळ्यासाठी उत्तम पेय आहे.


जिरापाणी । Jirapani Recipe in Marathi | How to make Jirapani